शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

...तर प्लास्टीकप्रमाणे वाळूउपशावरही बंदी, सरकार करतेय विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 06:03 IST

ज्या पद्धतीने वाळूचे उत्खनन सुरू आहे आणि नद्यांचे स्रोत आटत चालले आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टीक बंदीप्रमाणे वाळूउपसावरही बंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, शासन या दिशेने विचार करीत आहे.

नागपूर : ज्या पद्धतीने वाळूचे उत्खनन सुरू आहे आणि नद्यांचे स्रोत आटत चालले आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टीक बंदीप्रमाणे वाळूउपसावरही बंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, शासन या दिशेने विचार करीत आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार मलेशियासोबत चर्चा करीत आहे. यासंदर्भात दोन बैठकाही झाल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.क्षितिज ठाकूर व हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने वाळू उत्खननाचे लायसन्स देण्यावर कुठलेही प्रतिबंध लावलेले नाही. परंतु ग्रीन ट्रिब्युनलच्या निर्देशाचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत.याअंतर्गत आता ज्या रेतीघाटावर पाणी वाहत आहे तिथे मशीनने उत्खनन करता येऊ शकत नाही. अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी दंडाची रक्कम पाचपटीने वाढवण्यात आली आहे.आतापर्यंत २२ कोटी रुपये दंड करण्यात आला असून, १५ कोटीची वसुलीही करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘दंड जितका जास्त तितकीच हप्त्याची रक्कमही अधिक असते’ असा चिमटा काढला.पवार म्हणाले, प्लास्टिक बंदीप्रमाणेच वाळूबंदीवरही निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पर्याय म्हणून दगडाला बारीक करून त्याचा वाळू म्हणून उपयोग करण्याची सूचना केली. यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, सरकार या पर्यायाचा विचार करीत आहे. तसे प्रयत्न सुरू झाले आहेत.रेती आयातही याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. मलेशियामध्ये अशी वाळू तयार होते. परंतु ती पोत्यामध्ये भरून विकली जाते. आंध्र प्रदेशने ही वाळू बोलावली आहे.दुस-या राज्यातील वाळूवर बंदी शक्य नाहीमध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील वाळू सर्रास नागपूर व परिसरात पोहोचत असल्याच्या उपप्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संगितले की, ’दुसºया राज्यातील वाळूवर बंदी घालता येत नाही.घर बनविण्यासाठी दोन ब्रास वाळूचंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, घर बनविण्यासाठी दोन ब्रास वाळू देण्याची तरतूद आहे. त्याचे पैसे द्यावे लागतात. परंतु बीपीएल रेशन कार्डधारकांना ती नि:शुल्क दिली जाते. यावर सदस्यांनी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्यादृष्टीने जनजागृती करण्याची विनंती केली.वाळूअभावी शासकीय कामे थांबणार नाहीतवाळूअभावी अनेक शासकीय कामे रखडली असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर शासकीय कामासाठी वाळूचे वेगळे साठे उपलब्ध असतात. त्यामुळे वाळूअभावी कुठलीही शासकीय कामे थांबणार नाही. तसेच सहकारी तत्त्वावरील कामाचाही यात समावेश केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सोलापूर येथील घरकुलाची कामे रखडली असल्याचे संगितले, तेव्हा याची चौकशी करण्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार