Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीचा फटका मुकेश अंबानींनाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:59 IST2018-06-24T05:59:44+5:302018-06-24T05:59:49+5:30
प्लॅस्टिक बंदीचा फटका सर्वसामान्यांसारखा श्रीमंतानाही बसला आहे

Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीचा फटका मुकेश अंबानींनाही
मुंबई : प्लॅस्टिक बंदीचा फटका सर्वसामान्यांसारखा श्रीमंतानाही बसला आहे. मुंबईतील माटुंगामधलं कॅफे म्हैसूर हे तेथील इडली,सांबार.चटणीसाठी प्रसिद्ध आहे. मुकेश अंबानीसाठी दररोज इथून इडली,सांबार,चटणी पार्सल जातं. मात्र प्लॅस्टिकबंदीमुळे आज त्यांच्या घरूनच स्टीलचे डबे हॉटेलमध्ये आणण्यात आले होते. तसेच प्लॅस्टिकबंदीमुळे इडली-सांबार पार्सल घेऊन जाणाऱ्यांना रिकाम्या हाती परतावं लागत होतं. दररोज कॅफे म्हैसूरमध्ये पार्सल घेण्यासाठी बरीच गदी असते मात्र शनिवारी ही गर्दी प्लॅस्टिक बंदीमुळे तुरळक होती. एकूणच सर्वसामान्य ते श्रीमंतांना या प्लॅस्टिक बंदीचा फटका बसला.