शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

सांगलीत मृत गर्भाला ठरविले जिवंत, महापालिका प्रसूतिगृहाचा अनागोंदी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 8:11 PM

महापालिकेच्या प्रसूतिगृहातील कारभाराचा अजब नमुनाच शुक्रवारी महासभेत नगरसेवकांनी सादर केला. एका गरोदर महिलेचा गर्भ तीन आठवड्यापूर्वी मृत झाला असतानाही प्रसुतीगृहाने मात्र तो जिवंत असल्याचा शोध लावला.

सांगली : महापालिकेच्या प्रसूतिगृहातील कारभाराचा अजब नमुनाच शुक्रवारी महासभेत नगरसेवकांनी सादर केला. एका गरोदर महिलेचा गर्भ तीन आठवड्यापूर्वी मृत झाला असतानाही प्रसूतिगृहाने मात्र तो जिवंत असल्याचा शोध लावला. हा प्रकार संबंधित महिलेच्या जीवावर बेतला असता. पण त्यांनी वेळीच खासगी रुग्णालयात धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. या प्रकरणाचा सदस्यांनी पंचनामा करून चौकशी मागणी केली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.महापालिकेच्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज गायकवाड यांनी प्रसुतीगृहातील ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला. त्यांच्या वार्डातील एक महिलेच्या जीवावर बेतलेला प्रसंग सांगताच संपूर्ण सभागृह आवाक झाले. गायकवाड म्हणाले की, वार्डातील एक गर्भवती महिला तपासण्यांसाठी महापालिकेच्या प्रसूतिगृहात नियमित येत होती. काही दिवसापूर्वी ती तपासणीसाठी प्रसूतिगृहात आल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीचा अहवाल पाहून प्रसूतिगृहातील डॉक्टरांनी गर्भाची वाढ व्यवस्थित असल्याचे सांगितले. त्यानंतर दुस-याच दिवशी या महिलेच्या पोटात दुखू लागले.तिच्या नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तिथे तपासणी केली असता तीन आठवड्यापूर्वीच बालक मृत झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर शस्त्रक्रिया करून मृत गर्भ काढण्यात आला आणि या महिलेचा जीव वाचला. महापालिकेच्या प्रसुतीगृहातील डॉक्टरांवर भरवशावर संबंधित महिला व तिचे नातेवाईक बसले असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. या हलगर्जीपणाला जबाबदार असणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत आयुक्त खेबूडकर यांच्याकडे लेखी तक्रारही केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच काही पुरावेही त्यांनी सभेत महापौर हारूण शिकलगार व आयुक्त खेबूडकर यांच्याकडे दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही सभेला दिली.दरम्यान सभेत प्रसूतिगृहातील असुविधांबाबत नगरसेविका मृणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्वच्छतागृहे, गळक्या इमारती, सीसी टीव्ही कॅमेरे आदींची वाणवा असल्याचाही आरोप केला. प्रियांका बंडगर, शुभांगी देवमाने, अनारकली कुरणे आदींनी संताप व्यक्त केला. गटनेते किशोर जामदार म्हणाले, आयमएतर्फे प्रशिक्षणार्थी संबंधित डॉक्टर कृत्रिम प्रसूतीसाठी काम करायला तयार आहेत. तसे प्रस्ताव देऊनही सहा-सहा महिने निर्णय होत नाहीत. यावर खेबुडकर यांनी लवकरच यावर निर्णय घेऊ, असे जाहीर केले. परंतु गौतम पवार म्हणाले, प्रसुतीसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी प्रशिक्षणार्थींचा खेळ नको. तज्ज्ञांचीही नियुक्ती करू. यावेळी श्री. खेबुडकर यांनी महापालिकेमार्फत प्रसुतीतज्ज्ञ, फिजिशियन तसेच भूलतज्ज्ञ भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले.