शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:20 IST

 लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने आज प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली/मुंबई -  लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने आज प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्याबरोबरच सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशामुळे टीकेची झोड उठलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 11 आणि 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदीया यांचा समावेश आहे. या यादीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही स्थान देण्यात आले आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे यांच्यावर टीक झाली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष करून विखेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय राज्य पातळीवरील इतर अनेक नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील