‘पीकेव्ही’च्या बीटी कपाशीचे संशोधन अंतिम टप्प्यात!
By Admin | Updated: September 28, 2015 02:07 IST2015-09-28T02:07:42+5:302015-09-28T02:07:42+5:30
डॉ. पदेकृवि २0१७ मध्ये शेतक-यांना बीटीचे ५0 पाकीट उपलब्ध करू न देणार.

‘पीकेव्ही’च्या बीटी कपाशीचे संशोधन अंतिम टप्प्यात!
अकोला : बीटी कपाशीचे क्षेत्र देशात वाढले असून, ९0 टक्के शेतकरी बीटी कापसालाच पसंती देतात; परंतु बीटी बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कपाशीवर संशोधन सुरू केले असून, येणार्या २0१७ मध्ये शेतकर्यांना बीटीचे ५0 पाकीट उपलब्ध करू न दिले जाणार आहेत. देशात ९0 लाख हेक्टरच्यावर बीटी कपाशीची पेरणी केली जात असून, राज्यात ४0 लाख हेक्टर क्षेत्रावर या कपाशीची पेरणी केली जाते. यातील अर्धे म्हणजे २0 लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भातील ९५ टक्के शेतकर्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्याने या भागातील शेतकरी कोरडवाहू क्षेत्रात बीटी कापसाची पेरणी करतात, बीटी कापसाला पाण्याची नितांत गरज असते. त्यामुळे विदर्भातील शेतकर्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याची शक्यता असते. बियाणे महागडे असल्याने उत्पादन घटल्यास शेतकर्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. याच सर्व पार्श्वभूमीवर या वातावरणात टिकाव धरणार्या देशी बीटी कापसाचे संशोधन कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे. बीटीच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) आणि जे.के. बियाणे संशोधन कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. गत दोन ते तीन वर्षांंंपासून यावर संशोधन सुरू असून, जे.के. बियाणे संशोधन करणार्या कंपनीसोबत केलेल्या करारानुसार २0१६ मध्ये संशोधन पूर्ण होणार आहे. संशोधित बीटी बियाण्यांची पीकेव्हीच्या प्रक्षेत्रावर उगवणशक्ती व उत्पादन प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. महाबीज सोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार २0१७ मध्ये हे संशोधन पूर्ण होणार असून, याचवर्षी ५0 पाकीट शेतकर्यांना उपलब्ध करू न दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे देशी कापूस बियाण्यात या बीटी कापसाचा प्रयोग केला जाणार असल्याने या वातावरणात हे बीटी वाण उपयुक्त ठरणार असल्याचा दावा कापूस संशोधक करीत आहेत. देशी बीटी कापूस बियाणे निर्मितीकरिता महाबीज आणि जे.के.बियाणे संशोधन कंपनीशी या कृषी विद्यापीठाने करार केलेला आहे. २0१७ मध्ये बीटी कापूस बियाण्यांचे ५0 पाकीट तयार होतील, असे डॉ. पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी सांगीतले.