पीयूष बोंगिरवार ‘साहेबां’चे सहाव्या माळ्यावरील कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:40 IST2017-07-26T03:40:10+5:302017-07-26T03:40:10+5:30

पीयूष बोंगिरवार ‘साहेबां’चे सहाव्या माळ्यावरील कनेक्शन
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेकायदा बांधकाम करणाºया ‘वोक एक्स्प्रेस’ हे रेस्टॉरंट चालविणाºया कंपनीचे पीयूष बोंगीरवार साहेब हे एक संचालक आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. या रेस्टॉरंटच्या मालकांचे सहाव्या माळ्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कोणत्या अधिकाºयाशी नाते आहे, असा सवाल विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत केला.
प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावरील चर्चा चांगलीच रंगली. भाजपाचे सरदार तारासिंह यांनी
या हे रेस्टॉरन्ट चालविणाºया
‘स्पाईस अँड ग्रेन्स’ या परदेशी कंपनीने तेथे केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, लेखी उत्तराने आपले समाधान झाले असल्याचे तारासिंग म्हणाले. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पुढील प्रश्नही पुकारला पण काँग्रेसचे सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारणे
सुरू केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्या मदतीला धावले. या रेस्टॉरन्टच्या कंपनीचे संचालक हे सहाव्या माळ्यावर कोणाचे नातेवाइक आहेत, असा सवाल त्यांनी केला. पीयूष बोंगिरवार ‘साहेब’ हे संचालक असल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हणताच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बसूनच साहेब या शब्दावर आक्षेप घेतल्यावर पाटील यांनी, पीयूष बोंगिरवार संचालक आहेत, अशी सुधारणा केली. त्याचवेळी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आपल्याला अधिक
बोलता येणार नाही, असे सांगत पाटील यांनी स्वत:ची सुटका करवून घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ठ होते हे विभागाला माहिती होते तर मग सभागृहात का आणले, असे खडे बोल अध्यक्षांनी त्यांना सुनावले.
हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास आपण स्थगिती दिलेली नव्हती. या रेस्टॉरन्टने फुडकोर्ट इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यामध्ये केलेले काचेच्या भिंतीचे बांधकाम त्यांनी स्वत: हटविले आहे. परंतु गाळ्यासमोरील व्हरांड्याचा वापर ते रेस्टॉरन्टच्या बैठक व्यवस्थेसाठी करीत असून ते काढण्याबद्दल एमएमआरडीएमार्फत कारवाई सुरू आहे, असे राज्यमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही चांगले मंत्री आहात, कुणासाठी तुमचा अभिमन्यू होऊ नये एवढेच, असा चिमटा विरोधकांनी पाटील यांना काढला. कर्मकृत्य कोणाचे असते आणि बदनाम मात्र राजकारणी होतात, असा टोला राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मारला.