पिस्तुल रोखून मालकाला मारहाण

By Admin | Updated: February 8, 2016 04:29 IST2016-02-08T04:29:50+5:302016-02-08T04:29:50+5:30

जेवणाचे बील देण्याच्या कारणावरून हॉटेल मालकावर गावठी कट्टा रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर सोन्याचे ब्रेसलेटसह गल्ल्यातील

The pistol stole the owner | पिस्तुल रोखून मालकाला मारहाण

पिस्तुल रोखून मालकाला मारहाण

आष्टी (जि. बीड) : जेवणाचे बील देण्याच्या कारणावरून हॉटेल मालकावर गावठी कट्टा रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर सोन्याचे ब्रेसलेटसह गल्ल्यातील ५ हजार रु पयांची रोकडही लुटून आरोपींनी पोबारा केला. ही घटना शनिवारी रात्री आष्टी येथे घडली.
गणेश विलास डोंगरे असे यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी काका बबन गर्जे (रा.नाव्होली, ता.जामखेड), महेबूब शेख (रा. जामखेड), संतोष शिंदे, (रा.थापडगाव), उमेश उर्फपप्या यांच्यासह आठ जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गर्जे हे जामखेड बाजार समितीचे संचालक आहेत.

Web Title: The pistol stole the owner