पिंपरी - आर्थिक वादातून पत्नीने पतीला जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 08:37 IST2016-08-17T08:36:21+5:302016-08-17T08:37:15+5:30
आर्थिक वादातून पत्नीने पतील जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय धक्कादायक घटना पिंपरी येथे घडली

पिंपरी - आर्थिक वादातून पत्नीने पतीला जाळले
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी- चिंचवड, दि. १७ - आर्थिक वादातून पत्नीने पतील जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय धक्कादायक घटना पिंपरी येथे घडली आहे. मात्र सुदैवाने वेळेवर आग विझवण्यात आल्याने पतीची जीव वाचला आहे. रविवारी रात्री हिंजवडीलगतच्या मुळशी तालुक्यातील माणगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
दादा डाडर व नीता नाडर या दोघांमध्ये आर्थिक बाबींवरून वाद झाला, पती पैसे देत नसल्याने चिडलेल्या नीताने त्याच्यावर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने वेळेवर आग विझवण्यात आली व जखमी दादा डाडर यांचा जीव वाचला. मात्र असे असले तरी त्यांचा चेहरा, गळा, छाती व पाठील गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आरोपी पत्नी नीता डाडर फरार झाली असून तिच्याविरोधात हिंजवडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.