शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची बैठक रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:58 PM

अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची पहिली सभा रद्द झाली.

पिंपरी, दि. 12 -  अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची पहिली सभा रद्द झाली. लवकरच कंपनीची सभा होणार असून नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी आणि एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीचा विषय यावर चर्चा होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकाससाठी देश पातळीवरील शंभर शहरांचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार स्पर्धाही घेण्यात आली. मात्र, गुणवत्ता असतानाही स्मार्ट सिटीत समावेश झाला नव्हता. त्यामुळे पहिल्या आणि दुसºया यादीत शहरावर अन्याय झाला होता. दरम्यान पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी-चिंचवडचा समावेश करू, असे आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीनंतर या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. 

तसेच प्रशासनाने पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक, सभा महापालिकेतील मुख्य भवनात सभा शनिवारी सकाळी ११ला होणार होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर असणार होते. तसेच या बैठकीस  संचालक मंडळातील सदस्य महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग उपस्थित राहणार होते. तसेच या वेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले यांची संचालक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा कंपनीत समावेश करण्यात येणार होता. पहिल्या बैठकीस अध्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असते. कंपनी कायद्यानुसार सभेचे कामकाज चालविण्यात येते. मात्र, अध्यक्ष अनुस्थित राहिले होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि महत्त्वाचे काम असल्याने अध्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, असे कळविल्याने नियोजित सभा रद्द करण्यात आली.

 याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी कंपनीची पहिली बैठक आज होणार होती. मात्र, अध्यक्षांना ऐनवेळी महत्वाचे काम असल्याचे त्यांनी कळविले होते. तसेच सर्व सदस्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली त्यामुळे नियोजित बैठक रद्द केली आहे. लवकरच ही बैठक घेण्यासाठी नियोजन केले जाईल.’’