निवृत्त जवानाने मुलीच्या प्रियकराला घातली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:16 IST2018-11-25T06:16:04+5:302018-11-25T06:16:26+5:30

मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी योगेशच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.

Pill shot by a retired young girl for lover | निवृत्त जवानाने मुलीच्या प्रियकराला घातली गोळी

निवृत्त जवानाने मुलीच्या प्रियकराला घातली गोळी

मिरी (जि. अहमदनगर) : मुलीच्या प्रियकराला गोळी घालून ठार मारण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे शिवारात शनिवारी दुपारी घडली. पाथर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


योगेश एकनाथ जाधव (२५) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याचे वडील एकनाथ जाधव हे किरकोळ जखमी आहेत. मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी योगेशच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश फरार होता. पोलीस त्याच्या शोधात होते. शुक्रवारी योगेशला अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती मुलीच्या वडिलांना समजली. जामीन मिळाल्याचा राग मनात धरून त्यांनी शनिवारी दुपारी योगेशचे घर गाठले आणि त्याच्यावर गोळी झाडली.


ट्रॅक्टरवर चालक, जुळले सूत
योगेश जाधव हा जवखडे येथे माजी सैनिकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम पाहत होता. योगेश व त्या माजी सैनिकाच्या मुलीचे सूत जुळले. दोघांच्या प्रेमसंबंधाची परिसरात चर्चा होती. मुलीच्या वडिलांच्या हे निदर्शनास आली. त्यांनी मुलीला तंबी दिली होती.

Web Title: Pill shot by a retired young girl for lover