दुर्दैवी माळीण होतेय पिकनिक स्पॉट
By Admin | Updated: August 16, 2014 23:08 IST2014-08-16T23:08:29+5:302014-08-16T23:08:29+5:30
निसर्गाच्या एका घाल्यासरशी काळाच्या उदरात गडप झालेले दुर्देवी माळीव गाव आता पिकनिक स्पॉट बनू पाहत आहे.

दुर्दैवी माळीण होतेय पिकनिक स्पॉट
>नीलेश काण्णव - घोडेगाव
निसर्गाच्या एका घाल्यासरशी काळाच्या उदरात गडप झालेले दुर्देवी माळीव गाव आता पिकनिक स्पॉट बनू पाहत आहे.
भीमाशंकरकडे येणारे लोक माळीण गाव पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. माळीण ग्रामस्थांना तसेच दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत करण्याऐवजी दुर्घटनेच्या ठिकाणी येऊन ग्रुप फोटो काढणो, मजा मारणो, असे प्रकार होताना दिसत आहेत. या गर्दीमुळे येथील मदत कार्यातही अडचणी येऊ लागल्या असून, येत असलेला पर्यटकांचा लोंढा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत. माळीण दुर्घटना दि. 3क् जुलै रोजी घडली. या दुर्घटनेच्या पहिल्या दोन दिवसांत माळीणमध्ये मदतीसाठी येणा:यांऐवजी पहाण्यासाठी येणा:यांची गर्दी जास्त झाल्यामुळे डिंभे येथेच गाडय़ा अडविण्यात आल्या. मदत कार्य संपेर्पयत एकही अवांतर गाडी सोडण्यात आली नाही. हे मदत कार्य दि. 8 ऑगस्ट रोजी संपले. त्यानंतर येथून सर्व एनडीआरएफचे जवान, मशिनरी बाहेर निघाल्या. यादरम्यान अनेक हात मदतीसाठी पुढे आले. अनेकांनी भरपावसात काम केले व मदत कार्य पूर्ण होण्यासाठी हातभार लावला. हे काम संपल्यानंतरही माळीणमध्ये अनेक कामे शिल्लक राहिली आहेत. परिसरात स्वच्छता, माळीण दुर्घटनाग्रस्त लोकांना वेगवेगळी मदत, पुन्हा नवन्ीा माळीण उभे करण्यासाठी मदत, वाचलेल्या जनावरांना निवारा करण्यासाठी शेड उभारणी, माळीण गावाच्या
पलीकडे जाण्यासाठी असलेला रस्ता पूर्ववत सुरू करणो, अशी विविध कामे करणो बाकी आहे. यातील काही कामे सुरूही झाली आहेत. या कामांना मदतीच्या हातांची गरज आहे. सध्या माळीणच्या पुढचा चिंचेवाडीकडे जाणारा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
या गर्दीमुळे या कामात अडथळे येत आहेत. येथे येणा:यांची गर्दी वाढल्यामुळे माळीण फाटा ते माळीण गाव यादरम्यान वहातूककोंडी होऊ लागली आहे. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाऊन एकत्रित फोटो काढणो, इकडेतिकडे फिरणो, कसा डोंगर कोसळला यावर हसतखिदळत गप्पा मारणो असे प्रकार येथे येणारेा पर्यटक करीत आहेत.
यासाठी येऊ लागलेल्या पर्यटकांमुळे मदत कार्यात अडचणी येऊ लागल्या असून, त्याला आळा घालावा तसेच येथे येणा:या पर्यटकांनीही माळीण दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पाहण्यासाठी येण्याऐवजी काही काम करण्यासाठी आले पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त
करीत आहेत.
4सध्या माळीणमध्ये मदत करण्याऐवजी बघ्यांची गर्दी खूप होऊ लागली आहे. सलग चार दिवस सुटय़ा आल्यामुळे भीमाशंकरकडे गर्दी वाढली आहे. भीमाशंकरनंतर माळीण पाहण्यासाठीदेखील लोक येऊ लागले आहेत. माळीणमध्ये मदत कार्य संपल्यानंतर आरएसएसच्या स्वयंसेवकांनी सर्व परिसर स्वच्छ केला होता; मात्र सध्या येथे होत असलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे पुन्हा प्लॅस्टिक कचरा परिसरात पडला आहे. माळीण पाहण्यासाठी येणारे लोक परिसर स्वच्छ करण्याऐवजी येथे कचरा टाकून जात आहेत. या गर्दीमुळे येथे सुरू असलेल्या मदत कार्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत.