पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट
By Admin | Updated: June 30, 2016 12:34 IST2016-06-30T12:34:35+5:302016-06-30T12:34:38+5:30
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे

पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट
ऑनलाइन लोकमत
शहानूर संकुल
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे.शहानूर येथे जाण्याकरिता आकोट येथून एस.टी.महामंडळाची सकाळी ७.३० ला तर परत येण्याकरीता सांयकाळी ५.३० ची बस आहे. तसेच खासगी वाहने जाता येते.आकोट येथुन पोपटखेड धरण पाहल्यानंतर शहानूर या रस्त्यामध्ये छोटे-छोटे नदीनाले लागतात. नरनाळा अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. शहानूर निसर्ग संकुल येथे वनविभागाने खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली आहे. पंरतु बुंकीग सुरू असली तर मिळेल. त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत असणे आवश्यक आहे. शिवाय जंगल फिरण्याकरीता वनविभागाची सफारी उपलब्ध असल्यास मिळु शकते. गाईड सुध्दा मिळतात. लहान मुलांना खेळण्याकरीता साहीत्य आहे. तसेच वन्यप्राणी,वनविभागाची माहीतीसह आदीवाशी बांधवाच्या संस्कृतीचा ठेवा या संकुलात पाहावयास मिळतो.शहानूर पासुन उंचावर नरनाळा किल्ला आहे. या किल्लावर जाण्याकरीता वनविभागाचे अटी व शर्ती लागु करण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनाने गेल्यास एकाच दिवशी शहानूर पर्यटन केंद्र व सुरई धबधबाचा आनंद लुटता येतो.
सुरई धबधबा
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यानजीक सातपुडा जंगलातील धारगड मार्गावर सुरई धबधबा हा पर्यटकाकरीता पर्वणी आहे. मात्र सुरई धबधबा येथे जाण्याकरिता एस.टी.महामंडळाची बस सेवा नाही.आकोट येथून २२ किलोमीटर अंंतरावर धारगड मार्गावर हा धबधबा आहे. या ठिकाणी जाण्याकरीता खासगी वाहनाने जावे लागते. २०० फुट उंचावरुन पाणी पडत असल्याने धबधबा पासुन रस्त्यापर्यंत नदी वाहते. धबधब्याचे पाणी कोसळत असलेल्या ठिकाणी खोलगट भाग आहे. हा भाग धोकादायक आहे. त्यामुळे केवळ धबधबा पाहण्याचा व नंतर नदीमध्ये आनंद घेता येईल. नदीमधुन धबधबापर्यंत जावे लागते.दूचाकी वाहनाने जाण्याची मजा वेगळीच आहे.
पोपटखेडचे गेट पार केल्यानंतर रस्त्यामध्ये अनेक नदीनाले लागतात. सर्वत्र निसर्ग वातावरण आहे.
मेळघाट अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. खाण्यापिण्याची व राहण्याची सोय नाही.त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत न्यावे.
आदिवासीबहुल तसेच जंगलाचा भाग असल्याने सायंकाळपर्यंत परिसरातून बाहेर यावे लागते. सुरई धबधबा समोर धारगड येथे महादेवाचे प्राचीन शिवलिंग आहे. मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे येथे जाण्यास प्रतिबंध केला आहे.श्रावण (आॅगस्ट) महिन्यात कावडधारी जलाभिषेक करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
आणखी वाचा :
(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)
( पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)
(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)