मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:18 IST2021-11-23T09:16:56+5:302021-11-23T09:18:06+5:30

मानेचे दुखणे बळावल्याने त्यांनी विविध तपासण्या केल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना भरती होण्याचा सल्ला दिला होता.

Physiotherapy started on CM Thackeray | मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू

मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाइन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना योग्य वेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मानेच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी ठाकरे यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मानेचे दुखणे बळावल्याने त्यांनी विविध तपासण्या केल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना भरती होण्याचा सल्ला दिला होता.
 

Web Title: Physiotherapy started on CM Thackeray