उल्हासनगरात पुजारी गँगच्या धमक्यांचे फोन

By Admin | Updated: September 1, 2014 02:14 IST2014-09-01T02:14:28+5:302014-09-01T02:14:28+5:30

रवि पुजारीच्या नावाने शहरात धमकी सत्र सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून आघाडीचे उमेदवार ओमी कलानी, भारत गंगोत्री, राजू जग्यासी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांना धमकीचा फोन

Phones of priest gang threats in Ulhasnagar | उल्हासनगरात पुजारी गँगच्या धमक्यांचे फोन

उल्हासनगरात पुजारी गँगच्या धमक्यांचे फोन

उल्हासनगर : कुविख्यात गुंड रवि पुजारीच्या नावाने शहरात धमकी सत्र सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून आघाडीचे उमेदवार ओमी कलानी, भारत गंगोत्री, राजू जग्यासी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांना धमकीचा फोन आला आहे. काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांना दिलेल्या धमकीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघावर भाजपा आणि कलानी कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. २००९ च्या निवडणुकीत महायुतीतील कुमार आयलानी यांनी पप्पू कलानींचा पराभव केला होता. वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कलानीपुत्र ओमी हे आता सक्रिय झाले आहेत.
श्रीराम चौकातील गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भारत गंगोत्री यांना कुविख्यात गुंड रवि पुजारी याच्या नावाने धमकी आली असून, गंगोत्री यांनी कल्याण पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. तसेच आघाडीचे ओमी कलानी, पालिका विरोधीपक्ष नेता राजू जग्यासी यानंतर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांनाही रवि पुजारीच्या नावाने धमकीचे फोन आले आहेत.
जग्यासी यांना आयलानींच्या विरोधात उभे न राहण्याची तसेच ओमी यांना पाठिंबा न देण्याची धमकी पुजारीच्या नावाने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Phones of priest gang threats in Ulhasnagar