शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी वाढणार; अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 14:20 IST

अर्थसंकल्पातही करात वाढ न करता आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलाय, पवार यांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोलडिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Hike) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास तीन रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून वाढणारच असल्याचं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.

"पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून वाढणार आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरच इंधनाच्या किंमती वाढायला लागल्या आहेत. म्हणून अर्थसंकल्प सादर करताना गॅस सिलिंडर वापरणारा महिला वर्ग असेल, सीएनजीवर चालणाऱ्या बसेस, ऑटो, चारचाकी असतील त्यांना १ हजार कोटी रुपयांचा कर माफ केला आहे. कोरोनाच्या नंतरचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यात वाढ न करता आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलाय. सरकारही चाललं पाहिजे, लोकांना मदतही झाली पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे अशी आमची भूमिका होती," असंही पवार म्हणाले.तोपर्यंत सरकार व्यवस्थित चालणार"अधिवेशनादरम्यान आम्ही सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनापूर्वी खुप काही असं होणार तसं होणार असं बोललं गेलं होतं. तारखाही जाहीर केल्या होत्या. गेले अडीच वर्ष आपण हे पाहत आलो. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या तिघांनी ठरवलंय तोवर हे सरकार व्यवस्थित पणे चालणार," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

३.२० रुपयांची वाढजवळपास काही महिने स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) पुन्हा एकदा उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पाच दिवसांत तब्बल चार वेळ इंधन कंपन्यांनी ही वाढ केली. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली. अशा प्रकारे पाच दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ झाली.

या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये शनिवार २६ मार्च २०२२ रोजी पेट्रोलचे दर ९८.६१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.९७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. शनिवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८४ पैशांनी तर डिझेलचे दर ८५ पैशांनी वाढले. यानंतर  मुंबईत शनिवारी पेट्रोलचे दर ११२.५१ रुपये प्रति लिटरवरुन वाढून ११३.३५ रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेलची किंमतही ९६.७० रुपये प्रति लिटरवरून वाढऊन ९७.५५ रुपये प्रति लिटर झाले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPetrolपेट्रोलDieselडिझेल