पेत्कोव्हिच, सीमोन उपांत्य फेरीत
By Admin | Updated: June 5, 2014 00:53 IST2014-06-05T00:53:18+5:302014-06-05T00:53:18+5:30
रोमानियाच्या सीमोन हालेपने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पेत्कोव्हिच, सीमोन उपांत्य फेरीत
>पॅरिस : जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोव्हिचने इटलीच्या सारा इराणीचा तर रोमानियाच्या सीमोन हालेपने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पेत्कोव्हिच व सीमोन यांच्यादरम्यान फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीची झुंज रंगणार आहे. दुस:या उपांत्य लढतीत 2क्12 ची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोव्हाला कॅनडाच्या युज्नी बुकार्डच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे फ्रेंच ओपन
टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज तीन तास उशिरा
प्रारंभ झाले. आज कोर्ट फिलिप चार्टियरवर महिला
विभागातील खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोव्हिचने इटलीच्या सारा इराणीचा 6-2, 6-2 ने सहज पराभव केला. (वृत्तसंस्था)
शारापोव्हा ‘टी बॅग’; मरेच्या आईने केला उल्लेख
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागात सेरेना विलियम्स व ली ना यांच्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले असले तरी जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू रशियाच्या मारिया शारापोव्हाची आगेकूच कायम आहे. ब्रिटनच्या अॅण्डी मरेची आई जुडी मरे हिने शारापोव्हाचा उल्लेख ‘टी बॅग’ असा केला. विम्बल्डन चॅम्पियन मरेची आई व ब्रिटिश फेड कप संघाचे कर्णधारपद भूषविणा:या जुडी यांनी टि¦ट केले की,‘शारापोव्हा एक टी बॅग प्रमाणो आहे. तिला गरम पाण्यात टाका त्यानंतर बघा ती कडक होते.’ 2क्12 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविणारी व गत उपविजेती शारापोव्हाने स्पेनच्या गार्बाईन मुगुरुजाचा पराभव करीत यंदाच्या मोसमात फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सामन्यानंतर पत्रकारांनी शारापोव्हाला जुडीबाबत विचारले असता तिने सर्वप्रथम जुडी कोण आहे, असा प्रतिप्रश्न केला. चहाची चाहती असलेल्या शारापोव्हाने टी बॅग संबोधण्याचा अर्थ विचारला. मला याबाबत काही कळले नाही, असेही शारापोव्हा म्हणाली. पत्रकारांनी शारापोव्हाला याचा अर्थ समजावून सांगितला. या इंग्रजी म्हणीचा अर्थ समजल्यानंतर शारपोव्हा म्हणाली,‘जुडी फारच कल्पक आहे. माझी प्रशंसा करण्यासाठी तिला अन्य शब्दांचाही वापर करता आला असता, पण तिने या इंग्रजी म्हणीचा वापर केला. शारापोव्हाला फ्रेंच ओपन स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.