शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

मुख्यमंत्र्याच्या जवळच्या लोकांकडून आरक्षणाविरोधात याचिका म्हणजे फसवाफसवी : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 12:20 IST

धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारने घेतली आहे.

ठळक मुद्देनिर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवलेलोकांचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानविरुध्द टोकाची भूमिका

बारामती : धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारने घेतली आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील नागपूरचे आहेत.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्याचे अ‍ॅड. जनरल नेमले होतं. त्यांनी नंतर राजीनामा दिला वकिली सुरू केली. वकिली करण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण मुख्यमंत्र्याच्या जवळचे लोक आरक्षणाविरोधात याचिका दाखल करतात. ही फसवाफसवी असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.बारामती येथे पवार पत्रकारांशी बोलत होते.  ते म्हणाले, मागील निवडणुकीत अच्छे दिनचे आश्वासन देणारे पंतप्रधान आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून त्यांचे सारे सहकारी करीत आहेत, हे निषेधार्ह आहे.मुळात बुलढाण्यात राठोड नावाचे जवान शहीद झाले, त्यांच्या अंत्यविधीवेळी पंतप्रधान तेथून अवघ्या ४० किलोमीटरवर होते. देशासाठी शहीद झालेल्या जवानाला, त्याच्या कुटुंबियांना भेटावे, कुटुंबियांचे सांत्वन करावे,  असे त्यांना त्यावेळी वाटले नाही. मात्र, आता या जवानांच्या शौर्याचा लाभ राजकारणासाठी ते करीत फिरत आहेत. त्यांच्या नावावर मते मागत आहेत.

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानविरुध्द टोकाची भूमिका मोदी सातत्याने पाकिस्तानविरोधात मी चॅम्पियन आहे, असे म्हणतात.  पण लोकांची भावना एका दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि दुसºया बाजूने पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी संबंध, असे दुहेरी ते वागतात. आताच्या पंतप्रधानांशी त्यांचे कसे संबंध आहेत, हे मला सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या या संबंधांवरून मला एक वाचनात आलेली गोष्ट आठवली. दोन राष्ट्रात कटुता होती, तेव्हा सत्ता टिकवण्यासाठी आम्ही काय करतो हे सांगताना त्यापैकी एका राष्ट्रप्रमुखाने स्टेटमेंट दिले होते की, आम्हाला संधी मिळेल तेव्हा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एकदम टोकाची भूमिका घेतो आणि सत्ता हातात ठेवतो. खरेतर सध्याची स्थिती पाहता ,असे काही चित्र येथे चालले आहे, अशी शंका येथे येऊ शकेल अशी स्थिती असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला.

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा