पीटर मुखर्जी तरुणी आणि पार्ट्यांच्या आहारी गेला होता, घटस्फोटीत पत्नीचा जबाब
By Admin | Updated: July 21, 2016 11:20 IST2016-07-21T09:03:03+5:302016-07-21T11:20:38+5:30
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीच्या घटस्फोटीत पत्नीचा गुप्त साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आला असून पीटर तरुणी आणि पार्ट्यांच्या आहारी गेला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे

पीटर मुखर्जी तरुणी आणि पार्ट्यांच्या आहारी गेला होता, घटस्फोटीत पत्नीचा जबाब
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 21 - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीच्या आयुष्यात अनेक स्त्रिया होत्या. त्याच्या आयुष्यात नैतिकता नावाचा कोणताच प्रकार नव्हता असा जबाब पीटरच्या घटस्फोटीत पत्नीने दिला आहे. सीबीआयने गुप्त साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवला आहे. न्यायालयाने त्यांच्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत.
'पीटरकडे अजिबात नैतिकता नाही, तो नेहमी आपल्या आजुबाजूला असणा-या तरुणींची सोबत आवडायची. त्याला रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करणं आवडायचं. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया होत्या. त्यामुळेच मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला', असं शबनम सिंग यांनी सांगितलं आहे.
शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने सील लिफाफ्यात विशेष सीबीआय न्यायालयात सादर केलेल्या गोपनीय साक्षीदाराच्या साक्षीची प्रत मिळावी, यासाठी पीटर मुखर्जी याने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सीबीआयने पुरवणी आरोपपत्र फेब्रुवारीमध्ये दाखल केले. या आरोपपत्राबरोबर सीबीआयने एका अनामिक साक्षीदाराच्या जबाबाची प्रत सील लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केली. तपास सुरू असल्याचे कारण देत सीबीआयने साक्ष कोणाची आहे, हे सांगण्यास नकार दिला.
आमचा घटस्फोट झाल्यानंतर पीटरने इंद्राणीची आपली प्रेयसी म्हणून ओळख करुन दिली होती. आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. मी पीटरला शुभेच्छा दिल्या होत्या, तसंच तू कधी सुधरणार नाहीसं असंही म्हटलं होतं. कारण आपल्या पुर्वीच्या प्रेयसींप्रमाणे तो इंद्राणीलादेखील सोडून देईल असं मला वाटलं होतं अशी माहिती पीटरच्या घटस्फोटीत पत्नीने दिली आहे.
त्यानंतर कोलकत्ता येते असताना इंद्राणीने मला फोन केला. पोटगीची रक्कम एकदाच ठरवं व अधिक रक्कम मागू नकोस, असे तिने मला सांगितले होते. मात्र, हा माझा आणि पीटरचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे सांगून मी फोन ठेवून दिला, असेही त्यांनी जबाबात नमूद केले.
शीनाची एप्रिल 2012 मध्ये हत्या झाली. याप्रकरणी गेल्यावर्षी पोलिसांनी इंद्राणीला अटक केली व त्यानंतर संजीव खन्ना तसेच शामवरला अटक केली. हे प्रकरणी सीबीआयकडे वर्ग झाल्यानंतर पीटरला अटक झाली. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झाले आहे.