‘त्या’ जवानाच्या पत्नीला महापालिकेकडून नोकरी

By Admin | Updated: July 20, 2014 02:53 IST2014-07-20T02:53:33+5:302014-07-20T02:53:33+5:30

लोटस पार्क इमारतीच्या आगीत मृत्युमुखी पडलेला जवान नितीन इवलेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी आज सकाळी नकार दिला़ त्या

The person's wife has a job from the municipal corporation | ‘त्या’ जवानाच्या पत्नीला महापालिकेकडून नोकरी

‘त्या’ जवानाच्या पत्नीला महापालिकेकडून नोकरी

मुंबई : लोटस पार्क इमारतीच्या आगीत मृत्युमुखी पडलेला जवान नितीन इवलेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी आज सकाळी नकार दिला़ त्यामुळे सुमारे पाच तास त्यांचे शव भायखळा येथील मुख्यालयात होत़े अखेर प्रशासनाकडून महिनाभरात आर्थिक मदत व नोकरीची लेखी हमी मिळाल्यानंतर इवलेकर कुटुंबीयांनी नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला़
कर्तव्यावर असताना शहीद झाल्याने भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात सकाळी नऊ वाजता नितीन यांना मानवंदना देण्यात आली़ त्यानंतर त्यांचा मृतदेह घेऊन इवलेकर कुटुंबीय सायनर्पयत गेल़े परंतु त्यानंतर त्यांनी परत भायखळा मुख्यालयात येऊन मृतदेह नेण्यास नकार दिला़ नोकरी व आर्थिक मदतीची लेखी हमी मिळत नाही तोर्पयत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली़
पाच तासांच्या वादावादीनंतर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी अग्निशमन दलाचे प्रमुख यांना लेखी हमीपत्र देण्याचे आदेश दिल़े त्यानुसार नितीनच्या पत्नीला तिच्या शैक्षणिक आर्हतेप्रमाणो पालिका सेवेत सामावून घेण्यात येईल़ तसेच 15 लाख रुपयांची मदत महिनाभरात मिळेल, असे पत्र देण्यात आल़े त्यामुळे दुपारी 2 नंतर नितीनचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतला़ (प्रतिनिधी)
 
शहीद नितीनची पत्नी शुभांगीने परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आह़े त्यामुळे पालिका रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे समजत़े 
 

 

Web Title: The person's wife has a job from the municipal corporation