जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:39 IST2020-05-31T05:39:21+5:302020-05-31T05:39:39+5:30

चातुमार्सानिमित्त महत्त्वाचा निर्णय

Permission to travel to the sadhus of the Jain community | जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी

जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधू-साध्वींना काही अटींवर प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे.
हे चातुर्मास पर्व जुलैमध्ये प्रारंभ होत आहे. या काळात जैन साधू-साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहोचण्यासाठी पायी प्रवास करतात. काही वृद्ध साधू-साध्वी व्हील चेअरने प्रवास करून सेवक वर्गासह चातुर्मास स्थळी पोहोचतात. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागांतून साधू-साध्वी प्रवास करू शकत नाहीत. मात्र चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारीत स्थळी पोहोचण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. पायी प्रवासादरम्यान गर्दी होणार नाही, पाचपेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाही. मुक्कामच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोना संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, प्रवासादरम्यान दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. साधू-साध्वींच्या प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता व कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, याची जिल्हा व पोलीस प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

Web Title: Permission to travel to the sadhus of the Jain community