शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणानंतरच चित्रीकरणास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:54 IST

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लावावा लागला.

मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी होती. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी सावधानता व खबरदारी बाळगायची आहे. नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन करायचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लावावा लागला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र, आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. 

संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाईल. ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे, तेथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण ४० टक्क्यांहून अधिक आहेत ते सर्व जण लेव्हल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाचे चित्रीकरण केले जाऊ शकते. परंतु, त्यासाठी 

काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायो बबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करणे आवश्यक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून शासन घेईल त्या निर्णयांना एकजुटीने पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले.

या बैठकीला टास्क फोर्स प्रमुख  डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के. माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, जे. डी. मजेठिया, अमित बहेल, झी समूहाचे पुनित गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, सतीश राजवाडे, नीलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, गौरव बॅनर्जी, मधू भोजवानी, राहुल जोशी उपस्थित होते.

स्तर १ व स्तर २ जिल्ह्यांमध्ये चित्रीकरणासाठी पाच वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र १२ तासांची शिफ्ट असल्याने आम्ही चित्रीकरणासाठी आठ वाजेपर्यंत परवानगी मागितली आहे. सकाळी लवकर चित्रीकरण करून ते या वेळेत संपविता येईल. स्थानिक प्रशासनाला वेळ वाढविण्याचे अधिकार आहेत. वेळेचा प्रश्न लवकर निकालात निघेल, असा विश्वास आहे.     - नितीन वैद्य,     चित्रपट-मालिकांचे निर्माते

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcinemaसिनेमाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस