शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतकऱ्यांच्या मदत वाटपात टक्केनिहाय यादीचा खोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 09:04 IST

२,८२१ कोटींचा पहिला टप्पा; मराठवाड्यातील यंत्रणा व्यग्र

लोकमत न्यूज नेटवर्क   औरंगाबाद : मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाईसाठी मंगळवारी खातेनिहाय मदत जाहीर झाली. मात्र, शासनाने ७५ टक्केच मदत देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनुदान वाटपात खोडा निर्माण झाला आहे.

पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले. शनिवार आणि रविवारी सुटी असतानाही सगळी यंत्रणा ७५ आणि २५ टक्क्यांच्या दोन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात गुंतली होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ  या दोन हेडखाली येणाऱ्या निधींचे वाटप करताना शेतकऱ्यांच्या खातेनिहाय दोन वेगळ्या याद्या कराव्या लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या खात्यावरही मदत जाण्यास विलंब होईल.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याला ३७६२ कोटी रुपयांतील ७५ टक्के म्हणजेच २८२१ कोटी रुपयांची रक्कम मिळेल. १०० टक्के अनुदान एकाच टप्प्यात देण्याची तयारी सुरू होती; परंतु त्या निर्णयात अचानक माशी शिंकल्यामुळे ७५ टक्केच अनुदान वाटप करण्याचा आदेश जारी करण्यात आला. परिणामी, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांवर नव्याने यादी तयार करण्याच्या कामाचा ताण वाढला.  सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे वाटप होणार आहे. एसडीआरएफच्या दराने २५८५ कोटींच्या मागणीच्या तुलनेत १९३९ कोटी, तर वाढीव ११७७ कोटी रुपयांच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात ८८२ कोटी असे २८२१ कोटी मिळतील. मराठवाड्यात ३५ लाख ३४ हजार  जिरायती क्षेत्र  हेक्टरसाठी ३५३४ कोटी, बागायत ६८ हजार ३९१ हेक्टरसाठी १०२ कोटी, ५० हजार १०९ फळपीक हेक्टरसाठी १२५ कोटी, असे एकूण ३६ लाख ५२ हजार हेक्टरसाठी ३७६२ कोटी एकूण मदतीपैकी २८२१ कोटी पहिल्या टप्प्यात वाटप होतील.

जिल्हानिहाय अशी मिळेल मदत औरंगाबाद : ५५५ कोटींच्या तुलनेत सुमारे ३७५ कोटी रुपये  जालना :  ५६६ कोटींच्या तुलनेत ३८० कोटी रुपये  परभणी : ३४० कोटींच्या तुलनेत २५० कोटी रुपये   हिंगोली : २९७ कोटींच्या तुलनेत २२५ कोटी रुपये नांदेड : ५६७ कोटींच्या तुलनेत ३८० कोटी रुपये   बीड : ६६९ कोटींच्या तुलनेत ४७५ कोटी रुपये   लातूर : ४४८ कोटींच्या तुलनेत ३४० कोटी रुपये   उस्मानाबाद : ३१६ कोटींच्या तुलनेत २२५ कोटी रुपये

७५ टक्क्यांच्या तुलनेत अशी मिळणार मदत nजिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केले असून, ७५ टक्क्यांच्या तुलनेत ७५०० रुपये हेक्टरी मिळतील. nबागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५०, तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरीच्या एकूण मदतीपैकी १८ हजार ७५० रुपये सोमवारपासून मिळतील.

टॅग्स :Farmerशेतकरी