आघाडी सरकारला जनताच 'जागा' दाखवेल - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: August 27, 2014 13:54 IST2014-08-27T09:51:04+5:302014-08-27T13:54:39+5:30

'काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांना त्यांची जागा दाखवण्याची भाषा करत असले तरी यंदा जनताच त्यांची 'जागा' दाखवेल असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

People will show 'Aakash' to the alliance government - Uddhav Thackeray | आघाडी सरकारला जनताच 'जागा' दाखवेल - उद्धव ठाकरे

आघाडी सरकारला जनताच 'जागा' दाखवेल - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २७ - महायुतीतील जागावाटपावरुन शिवसेना, भाजपमधील तिढा कायम असतानाच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी जागावाटपावरुन आघाडीला फटकारले आहे. 'काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांना त्यांची जागा दाखवण्याची भाषा करत असले तरी यंदा जनताच त्यांची 'जागा' दाखवेल असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. 
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरेंनी आघाडीतील जागावाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. एकमेकांना कमी लेखण्याची संधी काँग्रेस व राष्ट्रवादीतील एकही नेता सोडत नाही. पण 'मित्रपक्ष' म्हणून निवडणुका लढवतात. जनतेला मूर्ख बनवण्याचे हे दुकान आता कायमचे बंद होईल असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. शिवसेना - भाजपमध्ये जाणा-या नेत्यांना थांबवायचे कसे असा प्रश्न आघाडीतील नेत्यांना पडल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. स्वबळावर किंवा आघाडी करुनही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव अटळ असल्याचे उद्धव ठाकरे नमूद करतात. सध्या जो तो स्बळाची बेडकी फुगवून दाखवत असून त्यामुळे राज्यातील जनतेची चांगली करमणूक होत आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला टोमणा मारला आहे. 

Web Title: People will show 'Aakash' to the alliance government - Uddhav Thackeray