'राज ठाकरेंची सभा ऐकायला लोकं येतात, पण 'मत' आम्हालाच देतात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 03:01 PM2019-10-12T15:01:01+5:302019-10-12T15:03:14+5:30

राज ठाकरेंचा करिश्मा मोठ्या सभा, इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम असतो. तसेच, मीडियावालेही त्यांच्या सभा लाईव्ह दाखवतात. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होते

'People come to hear Raj Thackeray's meetings, but vote is ours', Ramdas athawale says in mumbai | 'राज ठाकरेंची सभा ऐकायला लोकं येतात, पण 'मत' आम्हालाच देतात'

'राज ठाकरेंची सभा ऐकायला लोकं येतात, पण 'मत' आम्हालाच देतात'

Next

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उमेदवारांशिवाय लोकसभा निवडणूक आपल्या 'ए लाव रे तो व्हिडिओ'च्या प्रचारांनी गाजवली होती. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकांसाठीही ते आपल्या उमेदवारांसह मैदानात उतरले आहेत. पहिल्या सभेत राज यांनी शिवसेनेवर जबरी टीका केली. शिवसेनेच्या 124 जागांवरील तडजोडीवरुन राज यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. तसेच मी सत्ता मागायला आलो नसून विरोधी पक्षाची जबाबादारी मागायला आलोय, असंही राज यांनी म्हटलं होतं. राज यांच्या यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवणे शक्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय.   

राज ठाकरेंचा करिश्मा मोठ्या सभा, इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम असतो. तसेच, मीडियावालेही त्यांच्या सभा लाईव्ह दाखवतात. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होते. त्यांनी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मला मतदान करण्याचं केलेलं आवाहन योग्य आहे. राज यांचे काही लोक निवडूण आले तर, ते विरोधी पक्षातच बसणार आहेत. पण, विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याएवढं संख्याबळ मनसेकडे असणे अशक्य आहे. राज ठाकरेंचे भाषण ऐकायला लोकं येतात, पण मतं आम्हालाच देतात, असेही रामदास आठवलेंनी म्हटलं. विरोधी पक्षाची राज यांची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटत नाही. कारण, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हेच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सभागृहात राहतील, असेही आठवलेंनी म्हटलंय. 

दरम्यान, राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, सत्तेतला आमदार काही करु शकत नाही, विरोधी पक्षाचा आमदार प्रबळ असायला हवा. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. मी सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आलो आहे. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन पहिल्याच सभेत केलं. 
 

Web Title: 'People come to hear Raj Thackeray's meetings, but vote is ours', Ramdas athawale says in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.