पेन्शन १ तारखेलाच

By Admin | Updated: July 5, 2014 04:30 IST2014-07-05T04:30:33+5:302014-07-05T04:30:33+5:30

राज्यभरातील सहा लाखांहून अधिक पेन्शनधारकांना आता यापुढे पेन्शन जमा झाली का हे पाहण्यासाठी बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही

Pensions 1 date | पेन्शन १ तारखेलाच

पेन्शन १ तारखेलाच

विश्वास पाटील, कोल्हापूर
राज्यभरातील सहा लाखांहून अधिक पेन्शनधारकांना आता यापुढे पेन्शन जमा झाली का हे पाहण्यासाठी बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच त्यांच्या खात्यावर ही पेन्शन जमा होणार आहे; शिवाय ती जमा झाल्याचा मोबाइल मेसेजही त्यांना मिळेल.
सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते १ तारखेलाच अदा होत असतील तर मग पेन्शन का दिली जात नाही, असा विचार करून हे ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी करणारे पाऊल लेखा आणि कोषागार संचालनालयाने उचलले आहे.
काही ठिकाणी ‘आयएफएससी’ कोडची अडचण, जुने कर्मचारी, संगणकांचा तुलनेत कमी वापर यामुळे काही अडचणी आल्या; परंतु त्यावर मात करून पेन्शन देण्यास हे संचालनालय यशस्वी झाले आहे.
आतापर्यंत त्या-त्या जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयांतून पेन्शनधारकांची ज्या बँकेत खाती आहेत, त्या बँकेच्या नावे एकत्रित धनादेश पाठविला जाई.तो धनादेश पुन्हा क्लिअरिंगसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येई. त्यामुळे पेन्शन जमा होण्यास दरमहा २० तारीख येई. ही व्यवस्था बंद करून आता जसे वेतन अदा केले जाते त्याच पद्धतीने पेन्शन जमा करण्यात येत आहे.

Web Title: Pensions 1 date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.