जो चॅनल पाहाल...त्याचेच पैसे द्याल...समजून घ्या DTH चे नवे गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:05 PM2018-12-25T12:05:02+5:302018-12-25T12:44:29+5:30

ट्रायने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर डीश टीव्ही सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना घाम फुटला आहे.

pay only for those channel which you want to see... understand the new mathematics of DTH | जो चॅनल पाहाल...त्याचेच पैसे द्याल...समजून घ्या DTH चे नवे गणित...

जो चॅनल पाहाल...त्याचेच पैसे द्याल...समजून घ्या DTH चे नवे गणित...

googlenewsNext

नवी मुंबई : गेल्या आठवड्यापासून कुठल्या चॅनलवर अमिर खान, तर कुठल्या चॅनलवर 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका काही चॅनेलचे पॅकेज घ्यायला सांगत आहेत. ट्रायने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर डीश टीव्ही सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना घाम फुटला आहे. यापूर्वी आपण न पाहिलेले चॅनलचेही पैसे द्यावे लागत होते. तसेच त्यांनी ठरविलेल्या पॅकेजमध्ये आपल्याला हवे असलेले चॅनेल नसल्याने तो चॅनेल घेण्यासाठी आणखी पैसे द्यावे लागत होते. यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. 

काही वर्षे मागे डोकावून पाहिल्यास मोबाईलवर 1 मिनिट बोलण्यासाठी 1 रुपया द्यावा लागत होता. मग ते बोलने 10 सेकंद झाले असेल किंवा 60 सेकंद बोलने झाले तरीही 1 रुपया आकारला जायचा. मात्र, टाटा डोकोमोने 2008-9 मध्ये सेकंदानुसार पैसे आकारण्याची स्किम आणली आणि ही लूटालूट थांबली. आता प्रति सेंकंद पैसे आकारण्यासाठी महिन्याचे किंवा सहा महिन्याचे काही रुपयांचे रिचार्ज करावे लागते. यामुळे बरेच पैसे वाचत आहेत. अगदी तशीच स्किम ट्रायने आणली आहे. आपल्याला जे चॅनेल पाहायचे आहेत त्याच चॅनलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे अतिरिक्त पॅकेज घेण्याचे किमान 100 ते 150 रुपये वाचणार आहेत. 

डीटीएच सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आतापासूनच ग्राहकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत, असा आरोप ट्रायचे प्रमुख आर एस शर्मा यांनी केला आहे. तर टाटा स्काय, एअरटेलसह काही कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत 10 जानेवारीपर्यंच मुभा मागितली आहे. यामुळे 1 जानेवारी पासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता कमी आहे. 


समजून घ्या गणित 

  • केबल ऑपरेटर सरासरी 200 रुपये आकारतात. यामध्ये ते 350 टीव्ही चॅनेल्स दाखविण्याचा दावा करतात. मात्र, यापैकी आपल्या घरामध्ये 10 ते 15 चॅनेलच पाहिले जातात. तसेच डीटीएच ऑपरेटरचे आहे. त्यांनी ठरवलेले पॅकेज असे असते की त्यामध्ये पसंतीचे सर्व चॅनेल मिळत नाहीत. यामुळे त्या चॅनलसाठी नवीन अॅड ऑन चॅनल किंवा पॅक घ्यावे लागते. हा अतिरिक्त खर्च आता बंद होणार आहे. 
  • नव्या नियमांनुसार केबल किंवा डीटीएच पुरवठादारांकडून आपल्याला हवे असलेले चॅनेल निवडता येणार आहेत. सध्या एखादा स्पोर्टचा चॅनेल घ्यायचा झाल्यास महिन्याला 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. मात्र, हाच चॅनेल 1 ते 19 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे यापुढे कंपन्या सांगतिल ते चॅनेल नाहीत, तर आपल्याला हवेत तेच चॅनेल घेता येणार आहेत. म्हणजेच ग्राहक राजा असणार आहे. 

    ट्रायने चॅनेलची लिस्ट किंमतीसह दिली...

https://www.trai.gov.in/sites/default/files/PayChannels18122018_0.pdf  या लिंकवर तुम्ही चॅनेलचे 2017 चे दर पाहू शकता. 

बेस पॅकची किंमत 
यामध्ये दूरदर्शनचे 27 फ्री-टू एअर चॅनल असणार आहे. शिवाय अन्य श्रेणींमधील प्रत्येकी 5 चॅनल असतील. 130 रुपयांमध्ये 100 चॅनल आणि त्यावर 18 टक्के जीएसटी जमा केल्यास 154 रुपये मोजावे लागतील. या चॅनलमध्ये कदाचित तुम्हाला हवे असलेले मराठी, हिंदी, इंग्रजी सिनेमा, बातम्या, मालिकांचे चॅनेलही असतील. नसल्यास 1 रुपये ते 19 रुपये मोजून ते चॅनल अॅड करावे लागतील. किंवा एखाद्या चॅनेल कंपनीचे पॅकेज हवे असल्यास तेही कमी किंमतीत घेता येईल.

आता आणि नंतरचे शुल्क
कार्टून चॅनल पोगो पाहण्यासाठी सध्या 25 ते 30 रुपये महिना मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 4.25 रुपये असतील. 
स्टार स्पोर्ट चॅनलसाठी 60 ते 75 रुपये मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 19 रुपये मोजावे लागतील. 

29 डिसेंबरनंतर काय? चॅनेल न निवडल्यास DTH सेवा बंद होणार? 

एचडी पाहणाऱ्यांसाठीही आहे खास
एचडी चॅनेल पाहणाऱ्यांनाही हा निर्णय फायद्याचा आहे. एचडी चॅनेलचे पॅकेज 175 ते 200 रुपये आहे. मात्र, एचडी सोबत तेच चॅनेल साध्या व्हर्जनमध्येही दिसतात. यामुळे एचडी वापरणाऱ्यांना विनाकारण साध्या चॅनलचेही पैसे आकारले जातात. सहाजिकच आहे, एचडी पॅकेज घेणारे एचडी चॅनेलच पाहणार. त्यामुळे हा अतिरिक्त भारही कमी होणार आहे. 

Web Title: pay only for those channel which you want to see... understand the new mathematics of DTH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.