शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पवार काका-पुतण्यांनी केली ७३ एकर जमिनीची हेराफेरी!

By admin | Updated: June 16, 2015 03:40 IST

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ७३ एकर जमिनीची हेराफेरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतील काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची जमीन अजित पवार यांनी सत्तेत असताना शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानला बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी केला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बऱ्हाटे म्हणाले, ‘शासकीय मालकीची जमीन मिळकती जाहीर लिलावानेच हस्तांतर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. शिवाय नोंदणीकृत संस्थांना धर्मादाय आयुक्त यांची बीपीटी अ‍ॅक्ट १९५० कलम ३६ अन्वये लेखी परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र यापैकी कोणत्याही नियमाचे पालन न करता अजित पवार अध्यक्ष असलेल्या कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या ताब्यातील जमिनीचे हस्तांतरण विद्या प्रतिष्ठानला केले. यासंदर्भातील माहिती नुकतीच माहिती अधिकारातून मिळाली.’ त्यामुळे पवार काका-पुतण्यांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पवार काका-पुतण्यांसोबत या प्रकरणांत अनेक अधिकारीही सामील असल्याचा आरोप बऱ्हाटे यांनी केला आहे. विद्या प्रतिष्ठानने केलेल्या अर्जात धर्मादाय आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि कलम ३६ अन्वये लेखी परवानगी नव्हती. तरीही केवळ अवर सचिवांच्या शासन ज्ञापनच्या जोरावर पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २८ आॅगस्ट २०१४ रोजी आदेश पारित करून जमिनीचा ताबा नोंदणीकृत करारान्वये विद्या प्रतिष्ठानच्या नावे करण्याचे आदेश दिले. तर या दोन्ही कागदपत्रांशिवाय सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात खोट्या कागदपत्रांच्या आधारावर दस्त नोंदणी केल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाणे व पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्तांना याबद्दलची माहिती दिल्यानंतरही दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.मुख्यमंत्र्यांची टाळाटाळ!धक्कादायक बाब म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून गृहमंत्र्यांचा पदभार असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मात्र कारवाई करू आणि चौकशी करू अशी वरवरची आश्वासनेच मिळाल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले. त्यामुळे पवार काका-पुतणे, मुख्यमंत्री, पुणे पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दादांची अशीही खेळी कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी असलेले अजित पवार विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्तही आहेत. तर शरद पवार विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. पवारांच्या आदेशानंतर अजित पवार यांनी कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद मिळवले होते. त्यानंतर दादांनी वन विभागाची ही जमीन विद्या प्रतिष्ठानच्या नावावर केली. मात्र दादांची अध्यक्षपदाची निवड सहा महिन्यांपूर्वीच धर्मादाय आयुक्तांनी बेकायदेशीर ठरवल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले.