शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

पवारसाहेब.. चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो. ? महादेव जानकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:53 PM

पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल...

ठळक मुद्दे देशात सक्षम, समृध्द व संरक्षित सरकार हवे असेल तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी रासपची भुमिका

शिरूर: शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मात्र चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो ? पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल. असा टोला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला..         रांजणगाव गणपती येथे सभेला जाण्यापूर्वी जानकर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जानकर यांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले. पवार शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात. मग त्यांनी समाजात दरी का निर्माण केली ? त्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. खासगी साखर कारखानदारी आणली. ज्यांच्या नावाचा जप पवार करतात त्या शाहू महाराजांनी १८०२ मध्ये सर्वप्रथम आरक्षण दिले. मात्र शाहू महाराजांच्या जातीला आरक्षण मिळण्यासाठी १५० वर्ष लागली. मराठा समाजाचे ११मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.विरोधकांनी मराठा ओबीसी, मराठा धनगर यांच्यात भांडणे लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र शांत डोक्याने कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले.          जानकर म्हणाले , देशात सक्षम, समृध्द व संरक्षित सरकार हवे असेल तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी रासपची भुमिका आहे.आजपर्यंत भारताला जगात फारशी किंमत नव्हती. पंतप्रधान मोदी यांच्या कर्तृत्व व चांगल्या धोरणामुळे आज जगात भारत चौथ्या स्थानावर आहे, असा धोरणात्मक विचारांचा पंतप्रधान हवा की घराणेशाहीतला पंतप्रधान हवा ते जनतेनेच ठरवावे. गरीबी हटावचा नारा देणा ऱ्या काँग्रेसने सत्ता भोगली मात्र गरीबी कोणाची हटली याचे भारतातील जनतेने चिंतन करावे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उच्चशिक्षित आहेत, चांगले संसदपटू आहेत प्रशासनाची जाण असणारे नेतृत्व आहे. अशा उमेदवारास दिलेले एक  मत मोदींना पंतप्रधान बनवतील.यासाठी सरकारने आदिवासीना जेवढे बजेट आहे तेवढे  धनगरांना दिले. सर्वोच्च न्यायालयात एसटी संदर्भातील प्रलंबित आहे.तेथेही सरकार सकारात्मक  भूमिका घेत आहे. यामुळे आम्हीच धनगरांना आरक्षण देणार असल्याचा दावा जानकर यांनी केला.

............

बैलगाडा शर्यतीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र या विषयावर आम्ही सर्व सभागृह एकत्र आणले. आम्ही कायदा केला. न्यायालयात गेल्याने विषय प्रलंबित राहिला. मात्र कायद्याच्या अधीन राहून आम्हीच या शर्यती सुरू करू असा दावाही जानकर यांनी केला.

टॅग्स :ShirurशिरुरMahadev Jankarमहादेव जानकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार