शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

परवानग्यांच्या गर्तेत अडकला होमिओपॅथीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 6:28 AM

राज्य शासनाला अहवाल सादर : दोन आठवडे उलटूनही मान्यतेसाठी विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयुष मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी होमिओपॅथीला हिरवा कंदील दाखविला असला तरी अजूनही परवानग्यांच्या गर्तेत होमिओपॅथीचा मार्ग अडकला आहे.

राज्य शासनाने होमिओपॅथीचे तज्ज्ञ एकत्र करून टास्क फोर्स निर्माण केला. या सदस्यांनी मागील काही दिवसांत होमिओपॅथीसंदर्भात महत्त्वाची निरीक्षणे मांडून राज्य शासनाला अहवाल सादर केला; मात्र दोन आठवडे उलटूनही या अहवालाला मान्यता मिळालेली नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा विलंब कोरोनाच्या प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

इंडियन काऊन्सिल अॉफ मेडिकल रिसर्च या संस्थेने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठीउपचार पद्धतीचा प्रोटोकॉल ठरवून दिला आहे. मात्र त्यात केवळ अ‍ॅलोपॅथीचा समावेश केला आहे. एका बाजूला आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक, होमिओपॅथीला हिरवा कंदील दाखविला असताना दुसऱ्या बाजूला उपचार पद्धतीच्या प्रोटोकॉलमध्ये मात्र या पॅथींचा समावेश केला नसल्याने तज्ज्ञांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. होमिओपॅथीच्या टास्क फोर्समधील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. रुग्णांना खाट उपलब्ध होत नाही, त्यामुळे अशा स्थितीत कोणत्याही पॅथीविषयी दुराग्रह न ठेवता मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने आणि लवकरात लवकर कोरोनावर नियंत्रण मिळावे याकरिता होमिओपॅथी व आयुर्वेदाचा स्वीकार केला पाहिजे. ज्यांना या पॅथीचे उपचार घ्यायचे आहेत, त्यांना घरीच हे उपचार द्यावेत; अन्यथा कोविड रुग्णालयांमध्ये या पॅथीच्या उपचारांचा अवलंब करण्यावर भर दिला पाहिजे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास होईल मदतआयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, होमिओपॅथी, आयुर्वेदच्या उपचारांचा समावेश प्रोटोकॉलमध्ये केल्यास सर्व स्तरावर उपचारांत त्याचा समावेश करता येईल. जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे जाईल, असे टास्क फोर्समधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.