शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पाटणकर, तुम्ही पानसरेंच्या रांगेत !

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

पत्राद्वारे धमकी : कासेगावच्या घराला संरक्षण; व्यक्तिगत अंगरक्षकही पुरविणार

सातारा : धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रातील तपशील उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘तुम्ही विशिष्ट समाजघटकाचा अनुनय आणि विशिष्ट वर्गाचा द्वेष का करता,’ असा सवाल पत्रात करण्यात आला असून, ‘तुम्ही कॉ. गोविंद पानसरे यांच्या रांगेत आहात,’ असे पत्रात म्हटले आहे. पानसरेंवरील हल्ल्याच्या घटनेला महिना पूर्ण होण्याच्या दिवशीच पाटणकरांना अनोळखी व्यक्तीने हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्राचा अंकही पाठविला आहे. दरम्यान, कासेगाव (जि. सांगली) येथील त्यांच्या घराला मंगळवारी संरक्षण देण्यात आले आहे.आपल्याला धमकीचे चार पानी पत्र आल्याचे डॉ. पाटणकर यांनी चार मार्चला ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. हे पत्र कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आलेले आहे. एका समाजाचा अनुनय आणि एका समाजाचा द्वेष डॉ. पाटणकर करीत असल्याचा आरोप त्यात असून, ‘त्यामुळे तुम्हीही कॉ. गोविंद पानसरे यांच्या रांगेत आहात,’ असे पत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे या ‘रांगे’त न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांचेही नाव घेण्यात आले आहे. पानसरेंनी ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक एस. एम. मुश्रीफ यांच्याबरोबर मेळावे घेतले, असे पत्रात म्हटले आहे. तत्पूर्वी, पोस्टकार्डवर आलेल्या पत्रातही डॉ. पाटणकर यांच्यावर अनुनय आणि द्वेषाचेच आरोप करण्यात आले होते.डॉ. पाटणकर मंगळवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या घराला मंगळवारी संरक्षण देण्यात आल्याचा फोन घरून तसेच सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अभिजित पाटील यांच्याकडूनही आला. व्यक्तिगत अंगरक्षकही त्यांना पुरविण्यात येणार आहे. हा अंगरक्षक प्रशिक्षित असेल. विशेष म्हणजे, सांगलीच्या दौऱ्यात हा अंगरक्षक डॉ. पाटणकर यांच्या समवेत होता; पण त्यांनाच याची माहिती नव्हती. पाटील यांचा फोन आल्यावरच डॉ. पाटणकरांना ते समजले. (प्रतिनिधी)धमकीच्या पत्राचा तपशील जाहीर केल्यानंतर मला राज्यभरातून फोन आले. अघटित घडेपर्यंत आम्ही थांबणार नाही. ‘आम्ही सारे पाटणकर’ म्हणण्याची वेळ स्वत:वर येऊ देणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत. शांततामय आंदोलनाचा मार्गच पुढे सुरू ठेवावा, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे; परंतु चळवळीवर प्रेम करणारे राज्यभरातील कार्यकर्ते कशी प्रतिक्रिया देतील, हे मी सांगू शकत नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे.- डॉ. भारत पाटणकर, धरणग्रस्तांचे नेते