प्रवाशांची टॅक्सीचालकाकडून लूट

By Admin | Updated: April 20, 2015 02:53 IST2015-04-20T02:53:00+5:302015-04-20T02:53:00+5:30

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्यासाठी आलेल्या यूपीतील एका कुटुंबाला टॅक्सीचालकासह त्याच्या साथीदाराने लुटल्याची घटना शनिवारी

The passengers looted by taxi driver | प्रवाशांची टॅक्सीचालकाकडून लूट

प्रवाशांची टॅक्सीचालकाकडून लूट

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्यासाठी आलेल्या यूपीतील एका कुटुंबाला टॅक्सीचालकासह त्याच्या साथीदाराने लुटल्याची घटना शनिवारी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे घडली. याबाबत कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करीत यातील टॅक्सीचालकास अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारा सय्यद हसन (४२) हा तरुण नासीर सय्यद (१३) आणि असद सय्यद (१४) या दोन पुतण्यांना घेऊन शनिवारी सकाळी ७च्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आला होता. धारावी परिसरात त्यांना जायचे असल्याने त्यांनी येथील एका टॅक्सी स्टॅण्डवरून साडे-तीनशे रुपयांत एक टॅक्सी ठरवली. मात्र या वेळी या टॅक्सीचालकाचा आणखी एक साथीदार टॅक्सीत येऊन बसला.
आरोपींनी ही टॅक्सी ईस्टर्न एक्स्प्रेस हाय-वेवरून नेली. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी थांबवून आरोपींनी या तिघांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेत त्यांना रस्त्यामध्येच सोडले. त्यानंतर या तिघांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत तिघांना घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस गाठले. याच ठिकाणी आरोपी टॅक्सीचालक उभा असल्याचे सय्यद हसन यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाबू कांबळे (२८)
या टॅक्सीचालकाला ताब्यात
घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The passengers looted by taxi driver