शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना 'अनुभूती'साठी तुर्तास पहावी लागणार वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:11 IST

‘हाय-लक्झरी’ अशी ओळख असलेल्या ‘अनुभूती’ बोगीसाठी तुर्तास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे.

ठळक मुद्दे ‘हाय-लक्झरी’ अशी ओळख असलेल्या ‘अनुभूती’ बोगीसाठी तुर्तास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे. आधुनिक आणि प्रगत अशी अनुभूती बोगी  चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) तयार झाली आहे. बोगीसाठी पश्चिम रेल्वेवरील राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसचे नाव जवळपास निश्चित करण्यात येत आहे.

- महेश चेमटे मुंबई, दि. 13- ‘हाय-लक्झरी’ अशी ओळख असलेल्या ‘अनुभूती’ बोगीसाठी तुर्तास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे. आधुनिक आणि प्रगत अशी अनुभूती बोगी  चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) तयार झाली आहे. ही बोगी प्रवासासाठी सज्ज आहे. या बोगीसाठी पश्चिम रेल्वेवरील राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसचे नाव जवळपास निश्चित करण्यात येत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना अनुभूतीसाठी तुर्तास वाट पहावी लागणार आहे. 

लिंके-हॉफमॅन-बुश (एलएचबी) प्रकारात अनुभूती बोगीची निर्मिती करण्यात आली आहे. अनुभूती बोगीत ५६ आसने असणार आहेत. आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एलसीडी स्क्रीन, वैयक्तिक मोबाईल चार्जिंग अशी सुविधा देण्यात आली आहे. बोगीच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन असून यात जीपीएस तंत्रज्ञानाने ‘रिअल टाईम’ नूसार गंतव्य स्थान, येणाऱ्या स्थानकाला लागणारा वेळ, प्रवासाचे अंतर हे दिसणार आहे. या बोगीत प्रथमच सेंसर युक्त पाण्याचे नळ आणि  बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. अनुभूतीच्या बोगींना अ‍ॅन्टी-ग्राफिटी रंग देण्यात आला आहे. अशा पद्धतीने रंगवण्यात येणारी अनुभूती ही पहिलीच बोगी आहे.या प्रत्येक बोगीच्या किंमत सुमारे ३.५० कोटी रुपये आहे.पश्चिम रेल्वेच्या शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेसच्या माध्यमाने अनुभूती प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. सर्व सोई-सुविधांनी युक्त प्रवास या उद्देशाने ही बोगी तयार करण्यात आली आहे. यामुळे या बोगीचे प्रवासी भाडे वातानुकूलित चेअर आणि एक्झिकेटिव्ह चेअर यांच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता रेल्वे सुत्रांनी वर्तवली आहे. यंदाच्या वर्षात फक्त १० बोगी तयार करण्यात येणार आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तुर्तास तरी प्रवासासाठी 'अनुभूती' येणार नाही, अशी माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.प्रवाशांना सुरक्षित प्रवासासह सर्व सोई-सुविधांनी युक्त प्रवास अनुभवण्यासाठी अनुभूती बोगीची तरतूद रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती. तब्बल चार वषार्नंतर अनुभूती बोगी भारतीय रेल्वेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.अशी आहे ‘अनुभूती’- सेंसर युक्त पाण्याचे नळ आणि बायोटॉयलेट- अ‍ॅन्टी ग्राफिटी पद्धतीेने रंग- जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित वेग, येणारे स्थानक यांचे रिअल टाईम अपडेट- यु.एस.बी.पोर्ट असलेली ९ इंच एलसीडी स्क्रीन, हेडफोन आणि एसी जॅक- वैयक्तिक कॉल अटेंडरची सुविधा- वैयक्तिक   हेड लॅम्प आणि स्नॅक्स टेबल- आरामादायी आसने आणि पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे