शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 14:59 IST

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी विमानात एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. एअर इंडियाने याबाबत माहिती दिली. आहे.

संतोष हिरेमठ औरंगाबाद: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड(Dr Bhagwat Karad) यांच्यातला डॉक्टर परत एकदा जागा झाल्याचे चित्र विमानात पाहायला मिळाले. एअर इंडियाच्या दिल्ली-औरंगाबादविमान प्रवासात एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. याच विमानातून डॉ. भागवत कराड आणि खा. डॉ. सुभाष भामरे प्रवास करीत होते. प्रवाशाच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच दोघांनी त्याच्याकडे धाव घेत मदतीचा हात दिला. एअर इंडियाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

विमान प्रवासात एका प्रवाशाची प्रकृती बिघडली असून, विमानात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा विमानातील कर्मचाऱ्यांनी केली. तेव्हा डॉ. कराड आणि डॉ. भामरे यांनी त्या प्रवाशाकडे धाव घेतली. यावेळी प्रवाशाला प्राथमिक उपचार देण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत एका कार्यक्रमात अचानक कोसळलेल्या एका कॅमेऱ्यामनला देखील डॉ. भागवत कराड यांनी प्राथमिक उपचार दिले होते. डॉ. कराड आणि डॉ. भामरे यांच्या समयसूचकता आणि सेवाभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

कॅमेरामनसाठी डॉ. कराड धावलेनुकतीच, डॉ. भागवत कराड यांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मुलाखत आयोजित केली होती. तेथे एका कॅमेरामनला भोवळ आली व तो जमिनीवर कोसळला. यावेळी तात्काळ डॉ. कराड यांच्या ही बाब लक्षात आल्याबरोबर मंत्रिपद बाजूला ठेवून त्यांनी लगेच या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीवर प्रथमोपचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यापूर्वी असाच प्रसंग घडला होतादरम्यान, गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी असाच प्रसंग घडला होता. भागवत कराड इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांच्या मागील सीटवरील प्रवासी अचानक कोसळून पडला. यावळी डॉ. कराड यांनी तत्काळ प्रथमोपचार करत त्याला दिलासा दिला. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कराड अपघातग्रस्त मुलासाठी धावून गेले होते. औरंगाबाद शहरात कराड यांच्या गाडीसमोर एक रिक्षा उलटली. यावेळी कराड यांनी ताबडतोब आपला ताफा थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली. 2 लहान मुले जखमी झाली होती. डॉ. कराड यांनी स्वत:च्या खिशातील रुमाल काढून जखमी मुलाच्या ओठातून येणारा रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाला डोक्याला काही मार लागला आहे का, हे तपासले. 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAir Indiaएअर इंडियाairplaneविमानdocterडॉक्टरAurangabadऔरंगाबाद