शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

... या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त; रोहित पवारांनी शेअर केल्या कार्यकर्त्याच्या शरद पवारांबद्दलच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 08:35 IST

Sharad Pawar : शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावनाही कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत

ठळक मुद्देशरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावनाही कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेतपित्ताशयात खडे झाल्यानं शरद पवारांना दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल एका कार्यकर्त्यानं व्यक्त केलेल्या भावना शेअर केल्या आहेत. शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावना एका कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत. "या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश रेखांशावरील माती, किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापुरचा महापूर.. संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार, किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे," अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांनं आपल्या भावना व्यक्त केल्याचं रोहित पवारांनी शेअर केलं आहे. "हे पाय आहेत जमिनीवरचे... आणि याच जमीनीतील मातीचा टिळा आहे भाळी, त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत, पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी, कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त जे कधीच आटणार नाही," अशाही भावना त्या कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत.शरद पवारांवर पुन्हा एक शस्त्रक्रियाशरद पवार यांच्यावर पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितले आहे. शरद पवार यांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. तरीही डॉक्टरांनी १० दिवसांनी शस्त्रक्रिया करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.दरम्यान, शरद पवार यांना सोमवारी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आलं होतं. मात्र, अधिक त्रास जाणवू लागल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले. पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये निवडणुक प्रचार दौरा करणार होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारTwitterट्विटरNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी