शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही; खडसेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 19:19 IST

पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे.

मुंबईः पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे. पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होईल ही अपेक्षा करू या, वरिष्ठ नेत्यांच्या कानावर या गोष्टी मी घातलेल्या आहेत. मला काही कोणा मध्यस्थाची गरज नाही. मीडियाच्या माध्यमातून जावं याचीही मला आवश्यकता नाही. मी वरिष्ठांनी समक्ष बोलू शकतो. जे काही घडलेलं आहे, पक्षामध्ये जी अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. ते सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे, असंही ते म्हणाले आहेत. पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव हा काही पक्षातील अंतर्गत लोकांमुळे झालेला दिसतोय. प्रथमदर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, अशांची नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 8 दिवसांत विरोधी पक्षनेत्यांचं मूल्यमापन करता येणार नाही, आज विरोधी पक्षनेता देवेंद्रजी झालेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, तसेच उद्धवजींनाही मी शुभेच्छा देतो, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीला या ठिकाणी जनतेनं मतदान केलं होतं. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपा हे दोन प्रमुख घटक आहेत. दोघांच्याही समन्वयानं चर्चा झाली असती आणि दोन पावलं मागे गेलो असतो. तर महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 

दुर्दैवानं ओबीसी नेत्यांना डावलण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते आहेत, तेच या ठिकाणी हरलेले दिसतायत. पंकजाताई किंवा बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहतांना तिकीट न देण्याचा प्रकार असेल, तसेच ओबीसी नेत्यांचाही पराभव झालेला आहे. कारण काय असतील ते नंतर तपासू, महाराष्ट्रात जे 105 लोक आले, त्यापेक्षा अधिक आले असते तर पुनर्रचना झाली असती. प्रथमदर्शनी तरी असं दिसतंय आणि ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे, अशांची नावं मी स्वतः माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिलेली आहेत. त्यांनी कारवाई करावी ही अपेक्षा केलेली आहे, असंही एकनाथ खडसे म्हणालेले आहेत. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा