शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पक्षाने विचार करूनच दिली पार्थला उमेदवारी; अजित पवारांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 01:50 IST

मावळमधील कार्यकत्यांनीही धरला होता आग्रह

बारामती : पक्षाकडे विविध कार्यकर्ते उमेदवारी मागतात. उमेदवारीसाठी आग्रहदेखील धरतात. वेगवेगळ्या मतदारसंघांतून कार्यकर्त्यांची वेगवेगळी मागणी होत असते. त्याचप्रमाणे मावळमध्येदेखील कार्यकर्त्यांनी विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांनी ‘पार्थ’ला उमेदवारी दिल्यास मताधिक्य देण्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना सांगितले होते. त्यामुळे पक्षाने विचार करूनच पार्थला उमेदवारी दिल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पवार यांनी पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली. यावेळी पवार म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्र पक्षांचे लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप झाल्यानंतर मावळ मतदार संघातून उरण, पनवेल, कर्जत-खालापूर या भागातील विशेषत: शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतराव पाटील व त्यांच्या असंख्य सहकारीमित्रांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची भेट घेतली. पार्थला उमेदवारी दिल्यास परिसरातून चांगल्या प्रकारचे मताधिक्य देवू असे सांगितले. मावळ लोकसभा मतदार संघ झाल्यापासून सुरूवातीला शिवसेनेचे गजानन बाबर खासदार झाले. त्यानंतर श्रीरंग बारणे खासदार झाले.मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाली. कारण आमचेच सहकारी लक्ष्मणराव जगताप शेकाप तून उभे राहिले. तर राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर उभे राहिले. अतिशय कमी वेळ मिळाला. हा मतदार संघ सर्वाधिक सुशिक्षितांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. राज्य सरकारच्या तिजोरीत सर्वाधिक कर देणारे पुणे व रायगड जिल्हा आहे,आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मतदारांची संख्या पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, वाकड या भागात जास्त आहे.या मतदारांमध्ये उच्चशिक्षित,इंग्रजी चांगले समजणारा व बोलणारा उमेदवार हवा, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे पक्षाने विचार करून पार्थला उमेदवारी दिल्याचे पवार म्हणाले.सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची केव्हाही जागा सोडण्याची तयारी होती. याबाबत जयंत पाटील यांच्यासह आपण स्वत: सुजय यांच्याशी चर्चा देखील केली होती. हे चुकीचे असल्यास आपण म्हणेल ते ऐकन. मी जे बोलतो ते खरे बोलतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही कधीही जागा सोडण्यास तयार होतो. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असते, तरी त्यांना उमेदवारी दिली असती. मात्र राष्ट्रवादीचे लोक त्यांचे काम करणार नाहीत. त्याचा मला त्रास होईल, असे सुजय यांनी आपणास सांगितल्याचे पवार म्हणाले.वाऱ्याची दिशा ओळखून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघार घेतली, हा विरोधकांचा दावा राजकीय आहे. त्यांना राजकारण समजत नसावे. पवारसाहेब १४ वेळा निवडून आले आहेत. ते कोणत्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतात. त्यांच्या नावावर आमच्यासारखे अनेकजण निवडून येतात. शिवाय ‘साहेबांचा’ राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे,त्यांनी लोकसभा लढविली असती तर राज्यसेभेची जागा रिक्त झाली असती. त्यामुळे त्यांनी लोकसभेतून घेतलेल्या माघारी बाबत विरोधक राजकारणातून चुकीची वक्तव्य करत आहेत. घोड मैदान लांब नाही. राज्यातील ४८ जागांचे मे महिना अखेर चित्र स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले. गेले दोन दिवस बाहेर असल्याने माढा मतदार संघातील उमेदवारीच्या निणर्याबाबत माहिती नाही. त्याबद्दल पवार साहेबांसह जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी वरिष्ठ नेते माढा मतदार संघातील प्रमुखांशी चर्चा करीत आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस