शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पार्थ पवारच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:50 IST

मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार क्षेत्र हा सहा विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. मावळ लोकसभा मतदार संघ हा घाटमाथा आणि कोकण या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा असलेला मतदार संघ आहे.

- वैभव गायकरपनवेल विधानसभा मतदारसंघपनवेल - मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार क्षेत्र हा सहा विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. मावळ लोकसभा मतदार संघ हा घाटमाथा आणि कोकण या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा असलेला मतदार संघ आहे. २००८ साली या मतदार संघाची नव्याने रचना करण्यात आली आहे. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये भाजपाच्या मदतीने सेनेचे गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे हे खासदार याठिकाणाहून निवडून आले आहेत.पनवेल विधानसभा मतदार संघावर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे वर्चस्व राहिले आहे. सलग दोन वेळा रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर आमदार म्हणून निवडून आले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मतदार संघात विमानतळ कार्यान्वित होणार असल्याने भविष्यात नोकरीची संधी सर्वात जास्त आहे. सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व समस्या हा मतदारसंघातील प्रमुख विषय राहिला आहे. मेट्रो ट्रेन, विमानतळ, सेंट्रल पार्कसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्यान, गोल्फ कोर्स, पनवेल टर्मिनस हे बहुउद्देशीय प्रकल्प लक्षात घेता भविष्यातसर्वात चर्चिला जाणारा हा मतदार संघ आहे.२००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध सेना अशी लढत याठिकाणी रंगली होती. राष्ट्रवादीतर्फे आझम पानसरेंना २ लाख ८४ हजार मते पडली होती तर गजानन बाबर यांना ३ लाख ६४ हजार विक्र मी मते पडली होती. २०१४ मध्ये या मतदार संघात शेकाप, सेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत बारणे यांनी बाजी मारली होती.भाजपाच्या ताब्यात हा मतदार संघ आहे. विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांची ही दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये ते काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आले होते. मात्र खारघर टोलच्या विषयावरून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामधून दुसऱ्यांदा ठाकूर विधानसभेवर विराजमान झाले. या मतदार संघात शेकाप हा दुसऱ्या क्र मांकाचा पक्ष आहे. ग्रामीण भागात शेकापची पक्ष बांधणी चांगली आहे. मागील निवडणुकीतही शेकापच्या उमेदवाराला पनवेलमधून चांगली मते मिळाली होती.या मतदार संघात माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा देखील प्रभाव आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात आहे.महत्त्वाच्या घडामोडी - २0१६ साली पनवेल महानगर पालिकेची स्थापना. पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता.पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर आहे. यासंदर्भात सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांनी पालिकेवर मोर्चे काढले होते. सेनेने देखील भाजपाच्या ताब्यात असलेल्या पालिकेवर मोर्चा काढला होता. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे देखील या मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpanvelपनवेल