शिक्रापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले. अपहरणकर्त्यांनी 'तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का ? ' असे म्हणून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि.पुणे) पोलीसही चक्रावले असून या प्रकरणी स्वतः पार्थ पवार या घटनेच्या खोलात जावून माहिती घेण्यासाठी मुंबई व पुणे जिल्हा पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत. याबाबत चालक मनोज ज्योतीराम सातपुते ( वय २६, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे ) याने फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, दि.५ रोजी रात्री ८ वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी सातपुते यांच्याजवळ आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का ? आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असे म्हणून त्याला गाडीच्या पुढच्या सीटवर बसविले.
पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करून दिले बेशुद्धावस्थेत सोडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 17:58 IST
'तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का ? ' असे म्हणून अपहरण केल्याने पोलीसही चक्रावले असून याप्रकरणी स्वतः पार्थ पवार घटनेची माहिती घेत आहे.
पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करून दिले बेशुद्धावस्थेत सोडून
ठळक मुद्देमुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळून झाले होते अपहरण