परमार यांची सुसाइड नोट फॉरेन्सिक लॅबकडे

By Admin | Updated: October 10, 2015 01:15 IST2015-10-10T01:15:50+5:302015-10-10T01:15:50+5:30

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांची सुसाइड नोट ठाणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबला पाठविली आहे. अहवाल १५ दिवसांत अपेक्षित असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Parmar's suicide note with forensic lab | परमार यांची सुसाइड नोट फॉरेन्सिक लॅबकडे

परमार यांची सुसाइड नोट फॉरेन्सिक लॅबकडे

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांची सुसाइड नोट ठाणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबला पाठविली आहे. अहवाल १५ दिवसांत अपेक्षित असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
सुसाइड नोटमधील खाडाखोड लक्षात घेऊन ही नोट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. त्यानुसार, शुक्रवारी ती फॉरेन्सिक लॅबला पाठवून अहवाल लवकर मिळावा, अशी विनंती करण्यात आली आहे. नोट, नातेवाईकांकडून करण्यात येणारे आरोप अशा बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे यांनी दिली.
परमार यांनी ब्ल्यू रूफ कार्यालयात आत्महत्या केल्याचे ‘लोकमत’मध्ये अनवधानाने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी कासारवडवलतील कॉसमॉस हवाईन कार्यालयात आत्महत्या केली होती. (प्रतिनिधी)

आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी!
सूरज परमार यांच्या आत्महत्येची सीबीआय किंवा सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांच्या सासऱ्यांनी शुक्रवारी ठाण्यात कॉसमॉस परिवाराच्या वतीने आयोजित शोकसभेत केली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. १३ आॅक्टोबर रोजी एमसीएचआयच्या वतीने शांतता रॅली काढण्यात येणार आहे.

Web Title: Parmar's suicide note with forensic lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.