प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिन यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात या पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला. सुप्रिया सुळे यांना १६ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांचा गौरव करण्यात आला. "पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मला उपस्थित राहता आले नाही. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यानंतर दिली. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत मला सातत्याने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. प्रांजळपणाने नमूद करावेसे वाटते की, आपला विश्वास हीच माझ्यासाठी खरी उर्जा आहे. यामुळेच जनहिताच्या मुद्यांना संसदेत मांडता आल्याचंही त्यांनी ट्विटरवरून व्हिडीओद्वारे सांगितलं.
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 16:15 IST
Supriya Sule / Amol Kolhe : प्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिनच्या वतीनं देण्यात आला पुरस्कार
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार
ठळक मुद्देप्राईम पॉइंट फाऊंडेशन व प्रिसेन्स ई-मॅगझिनच्या वतीनं देण्यात आला पुरस्कारअमोल कोल्हे यांनी मानले जनतेचे आणि शरद पवार यांचे संधी दिल्याबद्दल आभार