शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 6:01 AM

शून्य अर्ज आल्याने १४,२६० जागा रिक्त; आतापर्यंत २०,३५० विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई : आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या लॉटरीत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या ११ दिवसांपासून सुरू आहे. २० एप्रिलपर्यंतच्या आरटीई प्रवेशाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात निवड झालेल्या एकूण प्रवेशांपैकी केवळ ३० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. आरटीईच्या पहिल्या सोडतीत राज्यातील ९,१९५ शाळांतील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २० एप्रिलपर्यंत त्यातील केवळ २० हजार ३५० प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीतच ५० टक्के प्रवेशही अद्याप निश्चित न झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे पहिल्या सोडतीनंतर राज्यात शून्य अर्ज आलेल्या एकूण १,८८५ शाळा असून त्यामध्ये एकूण १४,२६० जागा आहेत. पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे या जागा निदान पहिल्या सोडतीसाठी रिक्त राहणार आहेत. यातील अनेक शाळांचीच नावे पालकांना माहीत नाहीत तर काही शाळा या नव्याने मान्यता मिळालेल्या असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी ठरावीक शाळांकडेच पालकांचा ओढा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातही नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा, अशी पालकांची इच्छा असल्याचे पाहायला मिळते.दरम्यान, यंदा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र नसणे, अर्ज व प्रत्यक्ष गुगल मॅपिंगमध्ये घर ते शाळा यातील अंतर नियमबाह्य असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे अशी कारणे देऊन अद्यापही समितीकडून प्रवेश नाकारले जात असल्याची माहिती मिळत आहे.प्रवेश निश्चितीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर२० एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वात जास्त ४,९८५ प्रवेश हे पुण्यात निश्चित झाले आहेत. त्यानंतर ठाणे २,५२२ तर नाशिकमध्ये १,६४९ प्रवेश निश्चित झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश निश्चित झाला नसून सिंधुदुर्गमध्ये केवळ ५ आरटीई प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई पालिकेतील शाळांमध्ये आतापर्यंत १,१२४ तर इतर माध्यमाच्या शाळांत ३९४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण