कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आईवडिलांचे साकडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 14:24 IST2017-07-18T14:11:56+5:302017-07-18T14:24:58+5:30

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचे मातापिता त्याच्या सुटकेसाठी देवदर्शन करुन साकडे घालत आहेत.

Parents' bills for the release of Kulbhushan | कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आईवडिलांचे साकडं

कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आईवडिलांचे साकडं

ऑनलाइन लोकमत
सोलापूर दि. 18 - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचे मातापिता त्याच्या सुटकेसाठी देवदर्शन करुन साकडे घालत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. तत्पुर्वी सोमवारी ( 17 जुलै ) तुळजापूर, पंढरपूर येथीलही देवदर्शन आटोपले. कुलभूषण सुखरूप परत यावा, असे साकडे घातले.

आई अवंती जाधव आणि वडील तथा सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त सुधीर जाधव हे  मंगळवारी (18 जुलै ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माजी पोलीस उपायुक्त अकबर मुजावर, दुसरे मित्र डॉ. शितलकुमार शहा आणि रमेश मोहिते यांची सोलापुरात भेट घेतली.

तसेच जाताजाता कोटणीस यांच्या स्मारकासही भेट दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडत दोघांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधायला नकार दिला.

Web Title: Parents' bills for the release of Kulbhushan