शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचं पालकमंत्रिपद काही दिवसंच माझ्याकडे असावं अन्...; धनंजय मुंडेंची देवाकडे प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 18:47 IST

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या कोठडीत आहेत.

बीड - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत. यानंतर आता त्यांच्याकडे असललेली परभणीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात आज प्रतिक्रिया देताना, 'ही पालकमंत्रिपदाची जबाबदारी काही दिवसच माझ्याकडे राहावी, अशी इश्वराकडे प्रार्थना करतो, असे मुंडे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले, "यासंदर्भात आमच्या अध्यक्षांनी घोषणा केल्याचे मला सांगण्यात आले आहे. मात्र, सर्व गोष्टी अधिकृतपणे होणे आवश्यक आहे. फार मोठी जबाबदारी आहे. नवाब भाई स्वतः परभणीचे पालकमंत्रीपद पाहत होते. आता त्यांची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. इश्वराकडे प्रार्थना आहे की, काही दिवसांसाठीच ती जबाबदारी माझ्यावर असावी. पुन्हा ती जबाबदारी नवाब भाईंनीच घ्यावी."

जामिनासाठी 3 कोटींची मागणी, मालिकांच्या मुलाची तक्रार -कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या कोठडीत आहेत. मलिक यांच्या जामिनासाठी तीन कोटी रुपये  बिटकॉईनच्या स्वरूपात मागितल्याची तक्रार त्यांचा मुलगा आमीर मलिक यांनी केल्यानंतर, विनोबा भावे नगर पोलिसांनी भादंवि कलम 419, 420, 511 व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम 66 (ड) अंतर्गत इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात आरोपीचा क्रमांक, संदेश, मेलचे स्क्रीनशॉट पोलिसांना देण्यात आले आहेत. संबंधित क्रमांक तसेच मेल आयडीवरून पोलीस अधिक तपास करत आहे.

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस