शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंच्या विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 13:20 IST

काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

मुंबई -  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या 7 डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास राणे अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे. मात्र नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, असे  भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी होणाऱ्या चर्चेनंतर राणे अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   नारायण राणे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी  ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतचा  निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास राणेची कट्टर विरोधक असलेली शिवसेना विरोधी उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपाचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41, शेकाप - 3, बविआ - 3, एमआयएम - 2, अपक्ष - 7, सपा -1, मनसे - 1, रासपा - 1, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया -1 असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मतांची एकूण बेरीज 146 एवढी होते. तसेच अपक्षांसह काही छोटे पक्षही या पक्षांसोबत जाण्याची शक्यता आहे. एकट्या भाजपाकडे 122 मते असली तरी 145 मतांचा आकडा गाठणे भाजपासाठी अवघड आहे. त्यामुळे निवडून यायचे असल्यास राणेंना काही आमदारांची मते फोडावी लागणार आहे. हे एकंदरीत चित्र पाहून नारायण राणेंनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवता काही महिन्यांनंतर होणार विधान परिषदेची निवडणूक लढवून राणेंना विधान परिषदेत पाठवण्याचा विचार भाजपाकडून होऊ शकतो.  नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. विधानसभेतील सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करतील. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २० नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून,२९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राणे यांनी थेट भाजपात प्रवेश करण्याऎवजी स्वतंत्र पक्ष काढला आहे. त्यानंतर त्यांचा स्वाभिमान पक्ष औपचारिकपणे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र