छ. संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी पापळकर, नवल किशोर राम पुणे आयुक्त; आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:51 IST2025-05-22T12:51:58+5:302025-05-22T12:51:58+5:30
नवल किशोर राम हे पुणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. शीतल तेली-उगले यांची बदली क्रीडा आयुक्त; पुणे या पदावर करण्यात आली. धुळ्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर हे आता छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त असतील.

छ. संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी पापळकर, नवल किशोर राम पुणे आयुक्त; आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने बुधवारी आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवल किशोर राम हे पुणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. शीतल तेली-उगले यांची बदली क्रीडा आयुक्त; पुणे या पदावर करण्यात आली. धुळ्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर हे आता छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त असतील.
चंद्रकांत डांगे यांची बदली मुख्य सचिवांचे सहसचिव या पदावर करण्यात आली. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री विसपुते आता धुळ्याच्या नवीन जिल्हाधिकारी असतील. भूमिअभिलेख; पुणेचे अतिरिक्त आयुक्त आनंद भंडारी यांची बदली अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. अहिल्यानगरमध्ये या पदावर असलेले आशिष येरेकर हे अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी असतील.
अधिकारी
सध्याचे पद
बदलीनंतरचे पद
१) नवल किशोर राम
नियुक्तीच्या प्रतीक्षेत
आयुक्त, पुणे महापालिका
२) शीतल तेली उगले
नियुक्तीच्या प्रतीक्षेत
आयुक्त, क्रीडा; पुणे
३) जे. एस. पापळकर
जिल्हाधिकारी धुळे
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
४) चंद्रकांत डांगे
नियुक्तीच्या प्रतीक्षेत
सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय
५) सौरभ कटियार
जिल्हाधिकारी अमरावती
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
६) भाग्यश्री विसपुते
सीईओ, सिडको, छत्रपती संभाजीनगर
जिल्हाधिकारी धुळे
७) आनंद भंडारी
अतिरिक्त आयुक्त; भूमिअभिलेख, पुणे
सीईओ, जिल्हा परिषद अहिल्यानगर
८) आशिष येरेकर
सीईओ, जिल्हा परिषद अहिल्यानगर
जिल्हाधिकारी अमरावती.