पंकजा मुंडे यांचा भगवानगडाचा दौरा जाहीर
By Admin | Updated: October 8, 2016 15:26 IST2016-10-08T15:26:46+5:302016-10-08T15:26:46+5:30
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रमच शासनाने आज जाहीर केल्यामुळे त्या दसऱ्याला गडावर येणार असल्याचे नक्की झाले आहे़
पंकजा मुंडे यांचा भगवानगडाचा दौरा जाहीर
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ८ - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रमच शासनाने आज जाहीर केला आहे़ त्यामुळे त्या दसऱ्याला गडावर येणार असल्याचे नक्की झाले आहे़
मुंडे या दुपारी १२ वाजता हॅलिकॉप्टरने गडावर उतरणार आहेत. सव्वाबारा वाजता त्या संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेl. अडीच वाजता त्या गडावरुन पुन्हा परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे प्रयाण करतील. बारा ते अडीच असे अडीच तास त्या भगवान गडावर थांबणार आहेत या कालावधीचा तपशील दौऱ्यात देण्यात आलेला नाही़ त्यामुळे त्या दसरा मेळाव्यात भाषण करणार की नाही, याचा उलगडा या शासकीय कार्यक्रमातून होत नाही़
मुंडे यांनी गडावर यावे, मात्र त्यांना भाषण करता येणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे़. दसरा मेळाव्याला अद्याप प्रशासनाने अधिकृत परवानगी दिलेली नाही़ मुंडेंनी मात्र आपला दौरा जाहीर करुन गडावर जाणार असल्याचे नक्की केले आहे.