शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बीडमध्ये धनंजय मुंडेविरुद्ध पंकजा अशीच लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:34 IST

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे बीड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनजय मुंडे यांनी बीडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे.

मुंबई - लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्यांत मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखाजवळ येत असल्याने प्रचाराचा वेग सुद्धा वाढू लागला आहे. मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मात्र चुरशीची ठरणार आहे. बीडमध्ये निवडणूक जरी राष्ट्रवादी आणि भाजप पक्षात असली तरीही खरी लढत धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणार आहे. यापूर्वी बीडमधील लढत शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात रंगायची.  मुळात शरद पवार यांनी कधीही बीडमधून निवडणूक लढवली नाही. परंतु, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागायची. म्हणून बीडमधील लढतीला कायम महत्त्व निर्माण व्हायचे. आता ही लढत मुंडे कुटुंबियांतच रंगत आहे. 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे बीड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनजय मुंडे यांनी बीडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे पंकजा आणि प्रितम या दोन्ही बहिणींनी एकीकडे तर धनंजय मुंडे एकीकडे असा लढा पाहयला मिळत आहे. 

बीड मतदारसंघात प्रितम मुंडे युतीच्या उमदेवार आहे तर महाआघाडी कडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ही लढत धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणार आहे. प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी बहीण पंकजा मतदारसंघ पिंजून काढत आहे. तर दुसरीकडे भाऊ धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यासाठी सभांचा धडका लावला आहे. त्यामुळे मुंडेविरुद्ध मुंडे अशी लढत बीडकरांना अनुभवायला मिळत आहे. 

महाराष्ट्रातील राजकरणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात एका बाजूला राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहे तर दुसऱ्या बाजूला विधानसभेचे विरोधीपक्षनेता. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमध्ये भावा- बहिणीच्यातलं हाडवैरं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGopinath Mundeगोपीनाथ मुंडेSharad Pawarशरद पवारPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे