शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:42 IST

Ashadhi Wari 2025 Toll Free Pass Sticker : पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत सवलत पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Toll Free for Warkari: दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने टोलमाफी केली आहे. १८ जून ते १० जुलै या कालावधीत ही टोलमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. पंढरपूरच्या जाणाऱ्या १० पालखीमार्गावर ही टोलमाफी असेल. 

वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २८ मे रोजी बैठक पार पडली होती. त्या बैठकीत वारीला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशी २०२५ गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओ ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत सवलत पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सदरचे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागामार्फत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते

मुंबईमधील सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सीमेपर्यंतचा महामार्ग, त्याशिवाय मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग 

वारकऱ्यांनी स्टिकर्स कुठून घ्यावेत?

राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेत पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, शाखा, चौकी येथून भाविकांच्या मागणीप्रमाणे टोल फ्री पास घ्यावेत. हा पास किंवा स्टिकर्स घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक पोलीस चौकीत जावे लागेल. तिथे अर्ज भरून दिल्यानंतर हा पास तुम्हाला मिळेल. या टोलमाफीची मुदत केवळ १८ जून ते १० जुलै या कालावधीपर्यंत मर्यादित असेल. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीtollplazaटोलनाकाPandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सणMaharashtraमहाराष्ट्रAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा