शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Pandharpur wari 2018 :इंद्रायणीतीर भक्तीने ओसंडला : तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 19:37 IST

३३३व्या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी आणि देहूकर सहभागी झाले असून इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा भरल्याचा भास होत आहे. 

ठळक मुद्देवरुणराजाचा अभिषेक, टाळमृदंगाचा गजर   अणुरेणिया थोकडा, तुका आकाशाएवढा 

विश्वास मोरे

देहूगाव: वर्षभर वारकरी वाट बघत असलेला क्षण अनुभवयाला मिळत असून आषाढी एकादशीकरिता संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूनगरीतून पंढरीकडे प्रस्थान केले आहे. ३३३व्या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी आणि देहूकर सहभागी झाले असून इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा भरल्याचा भास होत आहे.  या सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट, खासदार श्रीरंग बारणे,अमर साबळे, आमदार बाळा भेगडे, देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, सोहळा प्रमुख अशोक निवृत्ती मोरे, विठ्ठल मोरे, सुनील दामोदर मोरे, दिलीप महाराज मोरे गोसावी आदी उपस्थित आहेत. यावेळी बापट यांनी बारणे यांच्यासोबत फुगडी खेळली. 

        यंदा पालखीचा मान असलेल्या बाभुळगावकर आणि अकलूजचा अश्व दाखल झाला असून विणेकरी बाहेर पडले आहेत. आता काहीवेळा मंदिरा फेरा मारून पालखी जवळच्या इनामदार वाड्यात मुक्कामासाठी राहणार आहे.संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी मार्गस्थ असल्याने देहूचा नूर केही वेगळाच आहे . सकाळपासूनच परिसरात भक्तीमय वातावरण असून आकाशात ढग दाटून आले होते. अधूनमधून पावसाचा शिडकावाही होत आहे. काल रात्रभर पाऊस कोसळत होता. सकाळी अकरा वाजल्यापासून उघडीप दिली आहे. देहूनगरीत प्रशासकीय, देवस्थान पातळीवर सज्जता जाणवत आहे. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने अन्नदान आणि वारकऱ्यांची सेवा करण्यात येत  आहे . कडेकोट बंदोबस्त मंदिर परिसरात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशद्वारात धातूशोधक यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारी, भाविकांना आत येण्याचा मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

व्हिडीओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

https://www.youtube.com/watch?v=xmYgnF0GFQM&feature=youtu.be

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीdehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी