शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 06:24 IST

चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. 

पंढरपूर/कोल्हापूर/नागपूर : सततच्या पावसाने पंढरपुरातील चंद्रभागा, कोल्हापुरातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. पेरण्या खोळंबलेल्या विदर्भातील   जिल्ह्यांनाही हलक्या ते मध्यम पावसाने दिलासा दिला आहे. 

प. महाराष्ट्रातील उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. 

हे पाणी पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रात पोहोचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला. 

चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वीर व उजनी धरणांची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीर धरणातून नीरा नदीत, तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. 

विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षाच

कोल्हापूरमधील राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, वारणातून १३ हजार ७७४ तर दूधगंगेतून १४ हजार १८७ घनफूट पाण्याचा विसर्ग,  नद्यांंच्या पातळीत वाढ.

पंचगंगा नदीची पातळी ३४ फुटांपर्यंत पोहोचली असून तिथे इशारा (३९ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली. 

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण ४०% भरले. सांगलीत ४ दिवस संततधार पाऊस.

नंदूरबार जिल्ह्यात  सलगच्या पावसाने भिंती कोसळल्याच्या घटना. दोन जखमी.  

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प कोरडा, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम. 

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक. 

विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा दिलासा, मात्र प्रकल्पांमध्ये  केवळ ३० टक्के साठा. 

मराठवाड्यातील प्रकल्पात केवळ ३२ टक्के साठा आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा. 

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीVidarbhaविदर्भ